अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आज जरी आपल्यात नसला तरी त्याच्या आठवणी मात्र प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. २ सप्टेंबर २०२१ साली सिद्धार्थ शुक्लाचं निधन झाला. वयाच्या ४० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचे निधन झाले.
या प्रतिभावान अभिनेत्याच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वाला धक्का बसला. सिद्धार्थ शुक्ला फक्त एक अभिनेता नव्हता अनेकांसाठी तो एक प्रेरणास्थान देखील होता.
सिद्धार्थ शुक्लाने त्याच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. या अभिनेत्याने त्याच्या निरागस आणि नम्र स्वभावाने ऑफ स्क्रीन देखील प्रेक्षकांची मने जिंकली.
पारस छाबराशी बोलताना, सिद्धार्थ शुक्लाने बिग बॉसचे एपिसोड एडिट करणार्यांची प्रशंसा केली होती. त्यांच्या सततच्या प्रयत्नांचे आणि त्यांच्या कामाबद्दलच्या समर्पणाचे कौतुक करताना दिसला होता.
सिद्धार्थ शुक्ला आणि असीम रियाझ यांच्यातील अनेक क्षण आपण बिग बॉस 13 च्या घरातमध्ये पाहिले आहेत. अनेक वेळा त्यांच्या बाँडने चाहत्यांचे भावूक देखील झाले आहेत. या दोघांना प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. असीमने सिद्धार्थच्या आठवणीत एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच काही दिवसांपुर्वी एका शोमध्ये म्हटले होते की, 'सिद्धार्थ आणि मी वेगळे नाही.' (Celebrity)
सिद्धार्थच्या कारकिर्दीविषयी बोलायचे झाले तर, 2008 मध्ये सिद्धार्थने त्याचा पहिला शो बाबुल का आंगन छुटे ना या हिट शोमध्ये काम केले. 2012 मध्ये बालिका वधू मधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सिद्धार्थ प्रसिद्ध झाला . झलक दिखला जा 6, खतरों के खिलाडी 7, दिल से दिल तक आणि यासारख्या अनेक शोचा भाग होता. बिग बॉस १३ सीजनचा सिद्धार्थने विजेता होता.
सिद्धार्थच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांना आणि सहकलाकारांना खुप मोठी धक्का बसला. सिद्धार्थ शुक्लाच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहत अनेक चाहत्यांनी त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. (Latest Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.