Famous Actress SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actress : "आप कहा हैं? ध्यान दीजिये..."; ऑनलाइन फूड ऑर्डरमध्ये झुरळ सापडल्यावर अभिनेत्रीचा तुकाराम मुंढेंना संतप्त सवाल

Shweta Tiwari Slams Tukaram Mundhe : टिव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने 'एनर्जी ड्रिंक'च्या ऑर्डरसोबत झुरळ आले असल्याचे सांगत व्हिडीओ शेअर केला असून त्यात एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांना टॅग केले आहे.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या फूड ऑर्डरमध्ये झुरळ

अभिनेत्रीने एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांना केले टॅग

अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. नुकतीच श्वेता तिवारीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या स्टोरीतून श्वेता तिवारीने आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना थेट प्रेशन केला आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

श्वेता तिवारीने एका ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲपद्वारे काही पदार्थ मागवले होते. ज्यात चक्क जिवंत झुरळ असल्याचे अभिनेत्रीने सांगितले. श्वेता तिवारीने एनर्जी ड्रिंक मागवले होते, तेव्हा त्याच्यासोबत झुरळ आल्याचा दावा केला आहे. त्यासंबंधित इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर करून तिने घडलेला सर्व प्रकार दाखवला आणि सांगितला आहे.

Shweta Tiwari

फूडच्या ऑर्डरमध्ये झुरळ आढळल्यामुळे अभिनेत्रीने अन्न आणि डिलिव्हरीच्या स्वच्छतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीजवर व्हिडिओ शेअर करत, अभिनेत्रीने तो कीटक दाखवला आणि गंमतीने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांना या घटनेची दखल घेण्याचे आवाहन केले. व्हिडीओत नेमकं काय जाणून घेऊयात.

श्वेता तिवारीने व्हिडीओत सांगितले की, "हमने इंस्टामार्ट से रेड बुल मंगाया। इसके साथ हमारे घर में कॉकरोच भी आया। यह देखो, कॉकरोच पूरे घर में भाग रहा है।" अभिनेत्रीने व्हिडीओत फर्निचरभोवती फिरणारे झुरळ दाखवले. अभिनेत्रीने ही परिस्थिती हलक्या-फुलक्या पद्धतीने हाताळल्याचे दिसून आले.

घडलेला प्रकार पाहून अभिनेत्री पुढे म्हणाली की, "तो क्या हमें तुकाराम मुंडे जी को टॅग करना चाहिए? मुंडे जी अभी ये इंस्टामार्ट से हमारे घर कॉकरोच भी आ रहे हैं। आप कहां हैं? ध्यान दीजिए।" तिने क्लिप शेअर करताना स्विगी, इन्स्टामार्टच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलसह तुकाराम मुंढे यांना टॅग केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत येणारच, १२ सप्टेंबरला निर्णय होणार- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT