Shreya Maskar
श्वेता तिवारी ही टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. वयाच्या 45 व्या वर्षी देखील ती आपल्या सौंदर्याने आणि हटके स्टाइलने चाहत्यांना घायाळ करते. श्वेता तिवारी बॉलिवूड अभिनेत्री पलक तिवारीची आई आहे.
श्वेता तिवारी आपल्या कुटुंबासोबत समर व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. तिने इन्स्टाग्रामवर आपल्या ट्रिपचे सुंदर फोटो शेअर केले आहे. ज्यात ती आपल्या मुलासोबत तुफान मजा-मस्ती करताना दिसत आहे.
श्वेता तिवारीने फोटोंना खूपच खास कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलं की, "Proof I accidentally walked into a Disney movie "
श्वेताने पांढरे प्रिटेंड टॉपसोबत काळ्यारंगाची पॅन्ट परिधान केली आहे. पायात चप्पल आणि खांद्यावर बॅग घेऊन श्वेता तिवारी फिरताना दिसत आहे. मोकळे केस , मिनिमल मकअप, हातात घड्याळ घालून ती ती एखाद्या कॉलेज गर्ल प्रमाणे क्यूट दिसत आहे.
अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरची स्माइल पाहून चाहते घायाळ झाले आहेत. मस्त रंगीबेरंगी फुलांच्या सानिध्यात अभिनेत्रीने फोटो क्लिक केले आहेत. एका फोटोत श्वेता तिवारी छत्री घेऊन पोज करताना दिसत आहे.
श्वेता तिवारीच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. "खूप क्यूट दिसतेस","सुंदर दिसतेस", "कॉलेज गर्ल", "तुझी स्माइल खूपच क्यूट आहे..." अशा कमेंट्स पाहायला मिळत आहे.
श्वेता तिवारीने हिंदी मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांची मने जिंकली. श्वेता तिवारी 'कसौटी ज़िंदगी की' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली. श्वेता तिवारी हिंदी 'बिग बॉस 4' ची विजेता देखील झाली आहे.
श्वेता तिवारीचे इन्स्टाग्राम 5.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती सोशल मिडियावर खूप सक्रिय असते. नेहमी तिच्या फिटनेसचे, ट्रिपचे आणि कामासंबंधित फोटो शेअर करून चाहत्यांना अपडेट देते.