Shubh Shravani Serial saam tv
मनोरंजन बातम्या

Shubh Shravani Serial : "प्रेम असावं तर असं असावं!"; 'शुभ श्रावणी' मालिकेची रिलीज डेट जाहीर, पाहा खास VIDEO

Shubh Shravani-Zee Marathi New Serial : 'झी मराठी' वाहिनीवर 'शुभ श्रावणी' मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेची रिलीज डेट आणि वेळ समोर आली आहे.

Shreya Maskar

'झी मराठी' वाहिनीवर 'शुभ श्रावणी' मालिका सुरू होत आहे.

'शुभ श्रावणी' मालिकेत वल्लरी विराज, सुमित विजय, लोकेश गुप्ते हे मुख्य कलाकार झळकणार आहे.

'शुभ श्रावणी' मालिकेची वेळ आणि रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

नवीन वर्षाची सुरुवात होताच अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. 'झी मराठी' वाहिनीवरील 'शुभ श्रावणी' मालिकेची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली. तेव्हा पासून मालिका कधी सुरू होणार याची चर्चा पाहायला मिळत आहेत. अखेर मालिकेची रिलीज डेट आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे. 'झी मराठी' वाहिनीने 'शुभ श्रावणी' या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे.

नवीन प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, श्रावणीला परीक्षेला जाण्यासाठी उशीर होतो. तिचे वडिलांशी फार पटत नाही. तिचे वडील हे शिक्षणमंत्री आहेत. तिला वडीलांचा आशीर्वाद घेण्यासाठी जायचे असते. पण त्यांची पत्रकार परिषद सुरू असते. श्रावणी वडीलांचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली जाते पण त्यांचे बोलणे ऐकून मागे फिरते. नाराज होते. मात्र तेव्हा मालिकेचा हिरो आशीर्वादाच्या रुपात श्रावणीला वडिलांचे पेन देतो. तो श्रावणीच्या वडीलांकडे काम करतो.

या प्रोमो व्हिडीओला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "न सांगताच मनीचं कळावं, प्रेम असावं तर असं असावं!" 'शुभ श्रावणी' ही नवीन मालिका 19 जानेवारीपासून संध्याकाळी 7 वाजता पाहायला मिळणार आहे. चाहते या मालिकेसाठी खूप उत्सुक आहे. मालिकेच्या पोस्टवर प्रेक्षकांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

'शुभ श्रावणी' स्टार कास्ट

'शुभ श्रावणी' मालिकेत 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री वल्लरी विराज मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत सुमित विजय झळकणार आहे. त्याने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'पिंकी आणि साहेब', विषय हार्ड या चित्रपटात झळकला आहे.

खलनायकाच्या भूमिकेत आणि श्रावणीच्या वडिलांची भूमिकेत प्रसिद्ध अभिनेता लोकेश गुप्ते दिसणार आहे. तब्बल 9-10 वर्षांनी लोकेश गुप्तेने छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. 'वादळवाट', 'जुळून येती रेशीमगाठी', 'या सुखांनो या' या त्याच्या मालिका खूप गाजल्या. तसेच मालिकेत इतर अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. यात अभिनेत्री आसावरी जोशी, जुई तनपुरे, कोमल शेटे यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बांगलादेशकडून कांदा आयातीवर निर्बंध, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

Success Story: कौतुकास्पद! IPS ट्रेनिंगदरम्यान झाले IAS; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; ऋत्विक वर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींच्या आज आर्थिक समस्या सहज दूर होतील; जाणून घ्या राशीभविष्य

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT