Shreyas Talpade Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shreyas Talpade Heart Attack: शूटिंगवरून परतताना श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका?

Shreyas Talpade : दिवसभराचं शूटिंग संपवून घरी परतल्यानंतर श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला. श्रेयस वेलकम टू जंगल या चित्रपटाच शुटिंग करून घरी आला होता. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

Bharat Jadhav

Shreyas Talpade Heart Attack:

बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला आहे. दिवसभराचं शूटिंग संपवून तो घरी परतला होता. अंधेरीच्या बेलेव्ह्यू हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आलीय. शूटिंगवरून घरी परतताच श्रेयस तळपदे बेशुद्ध झाला होता. यानंतर पत्नी दीप्तीने त्याला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. रुग्णालयात अँजिओप्लास्टी त्याची करण्यात आल्यानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest News)

हृदयविकाराच्या (Heart Attack) झटका आल्यानंतर त्याला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचं हॉस्पिटलकडून (Hospital) माहिती देण्यात आलीये. श्रेयस तळपदे 'वेलकम टू द जंगल' (Welcome to Jungle) या चित्रपटाचे शूटिंग करत होता. शूटिंगसंपवून तो घरी पोहोचला होता, त्यानंतर त्याच्या छातीत त्रास सुरू झाल्याने त्याला तातडीने हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे, परंतु हॉस्पीटलकडून कोणतेही वैद्यकीय बुलेटिन जारी केलेले नाही. दरम्यान श्रेयसची सेक्रेटरीने याबाबतीच माहिती देताना सांगितलं की, त्याला उच्च रक्तदाबाचा (High Blood Pressure) त्रास झाला होता. त्याला उद्या हॉस्पीटलमधून डिस्चार्ज दिलं जाईल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

shreyas Talpade

मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस(Shreyas Talpade) गुरुवारी वेलकम टू जंगल या सिनेमाच्या (Cinema) शुटिंगला (Filming) गेला होता. तो सेटवर सगळ्यांशी व्यवस्थित आणि हसून खेळून बोलत होता. त्याने दिवसभर शुटींग देखील केले आणि तो पूर्णपणे ठीक होता. त्याने काही अॅक्शन सीनदेखील शूट केले. त्यानंतर तो घरी परतला. घरी गेल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याने त्याची पत्नी दिप्तीला सांगितले. त्यानंतर तिने तातडीने त्याला रुग्णायलात नेले पण वाटेतच श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

SCROLL FOR NEXT