Shreya Bugde Received Natyarang Academy Award Pune Instagram @shreyabugde
मनोरंजन बातम्या

Shreya Bugde Share Post: प्रेक्षकांचे आभार मानत श्रेया बुगडेने शेअर केली पोस्ट, म्हणाली माझं कौतुक करायला आल्या अन्...

Shreya Bugde Received An Award: पुण्यातील नटरंग अकादमीच्या पुरस्काराने श्रेया सन्मानित करण्यात आले आहे.

Pooja Dange

Shreya Bugde Received Natyarang Academy Award : चला हवा येऊ द्या या विनोदी मालिकेतून अभिनेत्री श्रेया बुगडे आपल्या भेटीला येत असते. तमाम महाराष्ट्राला श्रेयाने तिच्या विनोदी खळखळून हसवले आहे. श्रेयाच्या या कामगिरीची सर्व स्थरावर कौतुक होत आहे. नुकताच श्रेयायाला एक मनाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

श्रेयाने तिच्या सोशल नेदीवर एक पोस्ट शेअर करत ही बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. पुण्यातील नटरंग अकादमीच्या पुरस्काराने श्रेया सन्मानित करण्यात आले आहे. या सोहळ्याला मराठी सिनेविश्वातील अनेक अभिनेत्री देखील उपस्थित होत्या. (Latest Entertainment Award)

श्रेया बुगडेने पोस्ट करत लिहिले आहे की, 'पुण्यात नटरंग अँकॅडमी तर्फे प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या 'शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कला गौरव पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले !! एका अतंत्य देखण्या आणि नेटक्या सन्मान सोहळयाचे आयोजन केल्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि कौतुक ... खूप खूप आभार.

पुण्याचे लाडके पालक मंत्री - मा .श्री. चंद्रकांत पाटील आणि गेली अनेक वर्षे मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सगळ्या दिग्गज अभिनेत्री माझं कौतुक करायला आल्या ... त्या सर्वजणींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना विशेष आनंद झाला...

त्यासाठी आदरणीय लीला गांधी ,अशा काळे ,सुहासिनी देशपांडे, जयमाला इनामदार, प्रिया बेर्डे आणि मेघराज राजे भोसले यांचे सुद्धा विशेष आभार . आणि माझ्यावर कायम प्रेम करणाऱ्या रसिक मायबाप प्रेक्षकांचेही मनापासून आभार .. लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा.' (Actress)

श्रेया बुगडेला मिळालेल्या या पुरस्काराचा सर्वांना आनंद आणि अभिमान आहेत. तिचे चाहते कमेंटच्या माध्यमातून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तसेच तिचे अभिनंदन देखील करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT