Gauri Sawant First Reaction After Watching Taali Web Series Instagram
मनोरंजन बातम्या

Gauri Sawant First Reaction After Watching Taali: ‘आपलीच जीभ दाताखाली येते तेव्हा...’; ‘ताली’ पाहिल्यानंतर गौरी सावंत यांची पहिली प्रतिक्रिया चर्चेत

Gauri Sawant First Reaction On Taali: तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सामजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांनी ही वेबसीरीज पाहिली असून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Chetan Bodke

Gauri Sawant First Reaction After Watching Taali Web Series: रवी जाधव दिग्दर्शित ‘ताली’ वेबसीरीज १५ ऑगस्टपासून जिओ सिनेमावर प्रदर्शित झाली आहे. तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सामजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावर असलेली ही वेबसीरीज सध्या सर्वत्र कमालीची चर्चेत आली आहे. या वेबसीरीजमध्ये श्री. गौरी सावंत यांची भूमिका, बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेननं भूमिका साकारली आहे.

तर या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वेबसीरीजचे दिग्दर्शन रवी जाधव तर कथेचे लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केलं आहे. नुकतीच तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सामजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांनी ही वेबसीरीज पाहिली असून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सामजिक कार्यकर्त्या गौरी सावंत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणतात, “आपलीच ‘टाळी’ जेव्हा जोरात वाजते, तेव्हा कधी कधी आपणच दचकतो, जसं आपली जीभ आपल्या दाताखाली येते तेव्हा. आज बायोपिक बघताना हेच होतं माझ्या मनात, ठिबक सिंचन डोळ्यातून चालूच होते. तृतीयपंथीयांच्या पालकांना काय वाटत असेल... होणारी घुसमट, त्रास याला न्याय दिला आहे सुश्मिताने... क्षितिज काय लिहिलंय रे बाबा... रवी जाधव यांनी खूप छान दिग्दर्शन केले आहे. माझ्या संपूर्ण समाजाकडून मी तुमचे आभार मानते... सरळ सोप्या पद्धतीने माझे आयुष्य दाखवल्याबद्दल... अफिफा नडीयादवाला हिने मला नव्याने जगासमोर आणलं... कार्तिक आणि अर्जुन यांचेही आभार...” सध्या श्री. गौरी सावंत यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे.

गौरी सावंत यांच्या या पोस्टवर ‘ताली’च्या दिग्दर्शकांची आणि लेखकांचीही कमेंट केली आहे. वेबसीरीजचे लेखक क्षितीज पटवर्धन म्हणतात की, “आमच्यासाठी सगळ्यात मोठी पावती ही आहे गौरी.” तर दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात, “ज्यांच्या आयुष्यावर आपण सीरिज तयार करतो, त्यांच्याकडून कौतुक होण्यासारखा दुसरा आनंद नाही. धन्यवाद गौरी सावंत आमच्यासाठी हे सर्वात मोठं कौतुक आहे.” सध्या गौरी सावंत यांच्या या पोस्टवर या दोघांचीही कमेंट बरीच चर्चेत आली आहे.

‘ताली’ वेबसीरीज १५ ऑगस्टपासून जिओ सिनेमावर प्रदर्शित झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच वेबसीरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता, वेबसीरीजच्या ट्रेलरने सुष्मिताच्या दमदार अभिनयाने सर्वांचेच लक्ष वेधले. सीरिजमध्ये सुष्मिता सेनने ट्रान्सजेंडर वर्कर आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांची भूमिका साकारली आहे. या वेबसीरीजमध्ये मराठी अनेक कलाकारांचा बोलबाला असल्याचा दिसून येत आहे. या वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेत्री कृतिका देव, सुव्रत जोशी आणि ऐश्वर्या नारकर देखील या वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

SCROLL FOR NEXT