Shraddha Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी 'ईठा' (Itha) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात श्रद्धा एका वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटासाठी तिने महाराष्ट्राची पारंपरिक कला असलेल्या लावणीचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. केवळ लावणीचे स्टेप्स शिकण्यावरच तिने भर दिला नाही, तर या कलेमागील भावना आणि कलाकारांचे आयुष्य समजून घेण्याचाही प्रयत्न केला. यासाठी तिने अनेक लावणी आणि तमाशा कलाकारांची भेट घेतली.
शकुंतलाजी यांच्याकडून शिकली लावणीचे बारकावे
श्रद्धाने सांगितले की, 'ईठा' चित्रपटाची तयारी सुरू केली तेव्हा मला लावणीबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यामुळे मी अनेक कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला. याच काळात माझी भेट शकुंतला-जी यांच्याशी झाली. या भेटीमुळे मला लावणीची खरी ओळख झाली. लावणी म्हणजे फक्त पायांच्या हालचाली किंवा डान्स स्टेप्स नाहीत, तर त्यामध्ये चेहऱ्यावरील हावभाव आणि भावना तितक्याच महत्त्वाच्या असतात, हे मला समजले. कलाकारांच्या आयुष्यातील आनंद, दुःख आणि संघर्ष त्यांच्या लावणीतून दिसून येतो, याची जाणीव मला झाली.
प्रत्येक पायाला बांधले ४ किलोचे घुंगरू
आपल्या लावणीच्या अनुभवाबद्दल बोलताना श्रद्धा कपूर म्हणाली, "पायांवर चार किलो वजनाचे घुंगरू प्रत्येक पायावर चार किलो बांधून सराव करणे, त्यांच्याशी जुळवून घेणे आणि त्यांना आपल्या शरीराचाच एक भाग समजणे, यात खूप वेळ गेला. या सरावादरम्यान एका गाण्याच्या शूटिंगसाठी तयारी करताना दुखापतही झाली होती. मात्र, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्माते दिनेश विजान यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. संपूर्ण टीमने माझे मनोबल वाढवले.
'जी जी रे जी' गाण्यात दिसला लावणीचा ठसका
'ईठा' चित्रपटातील 'जी जी रे जी' या गाण्यात श्रद्धाचा लावणीतील अंदाज पाहायला मिळला आहे. लावणीचा ताल, चेहऱ्यावरील हावभाव, उत्साह आणि प्रेक्षकांशी जोडले जाण्याची कला तिला विशेष आवडली. या चित्रपटात श्रद्धा महाराष्ट्राच्या प्रसिद्ध लावणी आणि तमाशा कलाकार विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारत आहे. विठाबाई यांच्या आयुष्यातील संघर्ष आणि त्यांचा कलाप्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
४ डिसेंबरला चित्रपटगृहात येणार 'ईठा'
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'ईठा' चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. दिनेश विजान, लक्ष्मण उतेकर आणि करिश्मा शर्मा या चित्रपटाचे निर्माते आहेत. श्रद्धा कपूरचा या चित्रपटातील पहिला लूक समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.