Pooja Hegde New Luxurious Car Instagram
मनोरंजन बातम्या

Pooja Hegde New Luxurious Car: श्रद्धा कपूरनंतर पूजा हेगडेने खरेदी केली आलिशान कार, किंमत एकून तुम्हाला बसेल दातखिळी...

Pooja Hegde News: दसऱ्याच्या मुहूर्तावर पूजा हेगडेने नवी कोरी अलिशान कार विकत घेतली आहे.

Chetan Bodke

Pooja Hegde New Luxurious Car

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर काही अभिनेत्रींनी नव्या अलिशान कार खरेदी केल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अशातच सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडेचीही चर्चा होत आहे. तिने दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी कोरी अलिशान रेंज रोव्हर एसयूव्ही कार विकत घेतली आहे. नुकतीच तिने या कारची डिलेव्हरी घेतली. रेंज रोव्हरही आलिशान कार घरी घेऊन जातानाचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत पूजा नवीकोरी कार घरी घेऊन जाताना दिसतेय. मिळालेल्या माहितीनुसार, तिने ही अलिशान कार तब्बल ४ कोटींच्या आसपास विकत घेतली आहे. सध्या सोशल मीडियावर ‘विरल भयानी’ या पापाराझी इन्स्टाग्राम चॅनलवरुन व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री आपल्या नव्याकार सोबत दिसत आहे. यावेळी तिने पापाराझींना आपल्या कारच्या बाजूला उभी राहून फोटोसाठी पोजेस ही देताना दिसली. (Social Media)

अभिनेत्रीचे नव्या कार सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावेळी अभिनेत्रीने निळ्या रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता. तर, तिने केस मोकळे सोडले होते. या लूकमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसत आहे. तिच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहेत. (Actress)

पूजा हेगडेच्या कामाबद्दल सांगायचे तर, अभिनेत्रीचा ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामध्ये ती शेवटची दिसली होती. ‘मोहोंजोदारो’ या चित्रपटातून पुजाला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. त्यासोबतच पूजाने ‘हाऊसफुल ४’, ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’, ‘सर्कस’ या चित्रपटातून पूजा हेगडे प्रकाशझोतात आली. (Bollywood Film

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

SCROLL FOR NEXT