Shraddha kapoor Yendex
मनोरंजन बातम्या

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने 'या' चित्रपटासाठी फॉलो केला स्ट्रिक्ट डाएट ; बरेच दिवस सॅलड आणि भाज्यांवर घालवले!

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूर तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असते. नुकतेच समोर आले आहे की, श्रद्धा कपूरने 'या' चित्रपटातील एका गाण्यासाठी स्ट्रिक्ट डाएट केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shraddha Kapoor : 2024 हे वर्ष बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी चांगले वर्ष ठरले. या वर्षी श्रद्धाचा बॉक्स ऑफिसवर तिच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट म्हणजे ब्लॉकबस्टर 'स्त्री 2'. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. श्रद्धा कपूर जिम किंवा योगा करताना दिसत नाही, पण ती तिच्या फिटनेसबाबत खूप गंभीर आहे. श्रद्धा तिच्या साधेपणा आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. पण 'तू झुठी मैं मक्कर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान श्रद्धा फक्त सॅलड खात होती हे फार कमी लोकांना माहिती आहे.

'तू झुठी मैं मक्कर'च्या शूटिंगदरम्यान श्रद्धा कपूर कडक डाएट फॉलो करत होती. एका मुलाखतीत, श्रद्धा कपूरची चुलत बहीण जनाई भोसले (आशा भोसले यांची नात) हिने तिच्या प्रवासाबद्दल सांगत तिचे कौतुक केले. 'आशिकी 2' चित्रपटाची आठवण करून देताना त्यात श्रद्धाचा अभिनय पाहिल्यानंतर किती अभिमान वाटला हेही तिने सांगितले. तू झुठी मैं मकर मधील तिच्या भूमिकेचे कौतुक करताना, जनाईने कबूल केले की हा चित्रपट श्रद्धासाठी खूप महत्वाचा होता.

'तू झुठी मैं मक्कर'साठी श्रद्धाने केला कडक डाएट

श्रद्धा कपूर बद्दल बोलताना जनाईने श्रद्धाचा रणबीर कपूरसोबत 'तू झुठी मैं मक्कर' मधील गाण्याची तयारी करत असताना रात्रीच्या जेवणाचा किस्सा शेअर केला. यावेळी श्रद्धा कठोर शाकाहारी आहाराला फॉलो करत होती ती फक्त सॅलड्स आणि निवडक भाज्या खायची. मला आठवतं ती काही कोशिंबीर आणि भाज्या खात होती. तिने मला सांगितले, 'मला 'तू झुठी मैं मक्कर'साठी गाणे शूट करायचे आहे, त्यामुळे मला हे जेवण खावे लागेल.'

श्रद्धा कपूरसोबत रणबीर कपूरही ‘तू झुठी मैं मक्कर’मध्ये मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. माहितीनुसार, श्रध्दा कपूरच्या या चित्रपटाने भारतात एकूण १७५ कोटींचे कलेक्शन केले होते. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूप आवडली होती. श्रद्धाचा फिटनेस आणि तिची ग्लॅमरस स्टाइलही चाहत्यांना भरभरून कौतुक केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

SCROLL FOR NEXT