Shraddha Kapoor Fan Proposed Her On Airport Saam TV
मनोरंजन बातम्या

Shraddha Kapoor Video: श्रद्धा कपूर झाली गोरीमोरी; एवढं लाजायला विमानतळावर नेमकं काय घडलं? VIDEO

Shraddha Kapoor Look : श्रद्धा कपूरने सुंदर एअरपोर्ट लूक केला आहे.

Pooja Dange

Shraddha Kapoor Fan Proposed Her : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर रणबीर कपूरसोबत 'तू झुठी मैं मक्कर' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बुधवारी अभिनेत्री मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. यादरम्यान अभिनेत्रीसोबत एक विचित्र घटना घडली.

श्रद्धा कपूरचे लाखो चाहते आहेत. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते एक झलक पाहण्यासाठी काहीही करू शकतात. तिला पाहण्यासाठी कधी तिच्या घराबाहेर तर कधी एअरपोर्ट तासंतास वाट बघतात. अभिनेत्रीला भेटण्यासाठी तिचा एक चाहता मुंबई एअरपोर्टवर तिची वाट पाहत होता.

अभिनेत्रीच्या या चाहत्याने तिच्यासाठी लाल गुलाबांचा गुच्छ घेऊन आला होता. अभिनेत्रीला पाहताच तिच्या चाहत्याने गुडघ्यावर बसून गुलाबाचा पुष्पगुच्छ देऊन तिला प्रपोज केलं. श्रद्धा देखील तिच्या चाहत्याचे मन राखले. तिने त्याने दिलेले पुष्पगुच्छ स्वीकारले आणि पापाराझींसमोर चाहत्यासोबत फोटो देखील क्लिक केला.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, नेटकरी त्यावर भरपूर कमेंट करत आहेत. श्रद्धा कपूर एरपोर्ट लूकविषयी बोलायचे झाले तर तिने पांढऱ्या रंगाची शॉर्ट आणि फुल स्लीव्हज असलेला टॉप घातला होता. पायात स्नीकर्स घालून लूक पूर्ण केला होता.

श्रद्धाच्या या व्हिडीओवर एका यूजरने लिहिले की, श्रद्धा खूप नम्र आणि फिट आहे. दुसऱ्याने लिहिले, भाव शाळेत जा, अभ्यास करा, एवढ्या लहान वयात सेलिब्रिटींना इम्प्रेस करत आहे. तिसऱ्या यूजरने लिहिले, तू तिच्या वडिलांना ओळखता नाही... जुने चित्रपट बघ जरा. (Latest Entertainment News)

श्रद्धा कपूर 'तू झुटीं मैं मक्कर'मध्ये दिसली होती. सध्या ती त्याच्या आगामी 'स्त्री 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात राजकुमार राव दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच ऑगस्ट २०२४ मध्ये प्रदर्शित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

Mumbai Firing : मुंबई हादरली! 32 वर्षीय तरुणीवर गोळीबार, परिसरात खळबळ

Tharवाल्याचा विकृतपणा! आधी कट मारला, नंतर रिव्हर्स घेत वृद्धाच्या अंगावर घातली भरधाव कार|Video Viral

Pune Rave Party : एकनाथ खडसेंचा जावई अडकला की, अडकवला? पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात आता नवा ट्विस्ट

CPR Controversy : महिलेला CPR देणे शिक्षकाला पडलं महागात; चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT