Tula Shikvin Changlach Dhada Instagram @rangshivani
मनोरंजन बातम्या

Tula Shikvin Changlach Dhada Update : अखेर अक्षरा-अधिपतीची जोडी जमली; सुरू झाली साखरपुड्याची लगभग

Tula Shikvin Changlach Dhada Latest Update : मालिकेत सध्या अधिपती-अक्षराच्या साखरपुड्याची तयारी सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Akshara Adhipati Engagement

छोट्या पडद्यावरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिका लोकप्रिय आहे. अंत्यत कमी काळात या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. मालिकेतील सर्व पात्रांवर प्रेक्षक अगदी कुटुंबासारखे प्रेम करतात. मालिकेत सध्या अधिपती-अक्षराच्या साखरपुड्याची तयारी सुरू आहे.

मालिकेत सुरवातीपासूनच अधिपती आणि अक्षराचं नात वेगवेगळ वळण घेताना दिसत आहे. त्यांच्या नात्यात मतभेद, मैत्री आणि आता प्रेम अशा सर्व गोष्टी घडत आहेत. मालिकेतील अक्षरा-अधिपतीच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे अक्षराची भूमिका साकारत आहे. तर हृषिकेश शेलार अधिपतीच्या भूमिकेत आहे. मालिकेत अक्षरा ही खूप हुशार, तत्वनिष्ठ दाखवली आहे. अक्षरा ही शिक्षिका आहे. तर याउलट, अधिपतीला शिक्षणात काहीच रस नसल्याचा दाखवला आहे.

मालिकेच्या सुरवातीलाच अधिपती अक्षराच्या प्रेमात पडतो. परंतु अक्षराच्या आयुष्यात खूप ट्विस्ट दाखवले आहे. आता सर्व अडचणींवर मात करत अक्षरा-अधिपतीचा साखरपुडा होणार आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मालिकेत सध्या साखरपुडा विशेष सप्ताह सुरू होत आहे.

अक्षरा-अधिपतीच्या साखरपुड्यावर एक गाणंदेखील चित्रित करण्यात आले आहे. यावेळी अक्षरा अधिपतीच्या साखरपुड्यासाठी सारखेच कपडे परिधान केले आहे. अक्षराने पांढऱ्या आणि लाल रंगाची साडी नेसली आहे. तर अधिपतीने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा आणि त्यावर लाल रंगाचा कोट घातला आहे. दोघेही या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

झी मराठी या वाहिनीने सोशल मीडियावर अक्षरा अधिपतीच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. मालिकेत अक्षरा-अधिपतीचा साखरपुडा ४ सप्टेंबरला होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: राज्यात पावसाचा हाहाकार, हिंगोलीत २ जणांचा मृत्यू

Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाच्या 32 परीक्षा पुढे ढकलल्या; या तारखेला घेण्यात येणार | VIDEO

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT