Shiv Thakare - Abdu Rozik Cute Video Instagram @shivthakare9
मनोरंजन बातम्या

Shiv Thakare - Abdu Rozik In Khatron Ke Khiladi 13 : जुन्या हिरोची पॉवर संपली... शिव-अब्दूचा क्युट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Shiv Thakare - Abdu Rozik Cute Video: शिवने आपल्या सोशल मीडियावरुन अब्दूच्या फोटोवर 'वेलकम टू खतरों के खिलाडी मेरी जान, मेरा जिगर' असं लिहून शेअर केले आहे.

Pooja Dange

Shiv Thakare - Abdu Rozik Viral Video: 'बिग बॉस'मुळे अब्दु रोजिक आणि शिव ठाकरे यांची लोकप्रियता अधिक वाढली आहे. अब्दू रोजिक आणि शिव ठाकरे यांनी असंख्य भारतीयांच्या मनात घर केले आहे. 'बिग बॉस'मध्ये या दोघांची घट्ट मैत्री झाली.

अब्दू आणि शिव यांच्या बिग बॉसमधील मैत्रीचं कौतुक आजही होताना दिसतं. बिग बॉसनंतरही त्यांची मैत्री कायम आहे. बऱ्याचदा हे दोघ एकत्र दिसतात. अब्दू आणि शिव दोघेही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. अनेकदा एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.

शिवनंतर आता अब्दू 'खतरों के खिलाडी' मध्ये दिसणार आहे. अब्दुने स्वतः ही बातमी सोशल मीडियावरून शेअर केली होती. बिग बॉसनंतर अब्दू-शिवची जोडी 'खतरों के खिलाडी'मध्ये दिसणार असल्याने त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. हे दोन्ही स्टार देखील प्रेक्षकांचे मनोरंजनाची तयारी करत आहेत. दरम्यान अब्दू केप टाउनला पोहोचला असून शिव स्टोरी शेअर ही बातमी सांगितले आहे. (Latest Entertainment News)

शिव ठाकरेने आपल्या सोशल मीडियावरुन अब्दूच्या फोटोवर 'वेलकम टू खतरों के खिलाडी मेरी जान, मेरा जिगर' असं लिहून शेअर केले आहे. दोघांचा एक क्युट व्हिडिओ शिवने शेअर केला आहे. त्यात शिवने अब्दुला उचलून घेतले आहे.

त्यांच्याच बोलणं सुरू आहे. शिव अब्दुला 'वेलकम ब्रो वेलकम' असं म्हणताना दिसत आहे. नंतर अब्दू त्याला खतरों के खिलाडी बद्दल विचारतो, 'सर्वकाही छान चालू आहे, फक्त तूझीच आठवण येत होती. आता तू आलायं ना मग अजूनच छान वाटतय. ये मज्जा कर फक्त मुलींपासून लांब राहा' असं शिव म्हणतो. त्यावर

त्यावर अब्दू म्हणतो,' का? मी असं काहीच करणार नाही. आता जुन्या हिरोची पॉवर संपली आता नवीन हिरो आलाय'. व्हिडिओत शिव आणि अब्दू एकमेकांची मस्करी करताना दिसतात.

एका व्हिडिओमध्ये शिव अब्दूचा कपडे बदलाताना व्हिडिओ शुट करताना दिसतोय. त्यावर शिव म्हणतो की, 'टीशर्ट नको काढू. सर्व मुली तुझ्यावर लाईन मारतील. माझा पत्ता कट होईल'. अब्दू आणि शिव नेहमीप्रमाणे धम्माल आणि मस्ती करताना दिसत आहे. त्या दोघांचा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडल्याचे दिसतंय.

'खतरों के खिलाडी'च्या शुटिंगला केप टाउन येथे सुरूवात झाली आहे. अब्दु रोजिकने पाहुणा म्हणून शोमध्ये एन्ट्री घेतली आहे. खतरों के खिलाडीच्या १३व्या सीझनमध्ये रोहित बोस रॉय, डेजी शाह, शिव ठाकरे, अर्चना गौतम, अंजलि आनंद, नायरा बनर्जी, अंजुम फकीह, रूही चतुर्वेदी, ऐश्वर्या शर्मा, अर्जित तनेजा, शीजान खान, सौंदस मौफकीर हे कलाकार स्टंट करताना दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून मुलीवर बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT