Shilpa Shinde Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shilpa Shinde: 'अंगूरी भाभी' जेलमध्ये जाणार? प्रोड्यूसरवर हरेसमेंटचे खोटे आरोप भोवले, अभिनेत्रीच्या अटकेची मागणी

Shilpa Shinde: 'भाभी जी घर पर हैं' मालिकेच्या निर्मात्यावर केलेल्या जुन्या आरोपांबाबत शिल्पा शिंदेच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या अटकेची मागणी होत आहे.

Shruti Vilas Kadam

Shilpa Shinde: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ‘भाभी जी घर पर हैं’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अंगुरी भाभीने या मालिकेचे निर्माते संजय कोहली यांच्याविरोधात जवळपास दहा वर्षांपूर्वी केलेल्या छळाच्या आरोपांबाबत शिल्पाने नुकतेच केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना तिने १० वर्षांपूर्वी केलेल्या आरोपांविषयी दिलेल्या विधानामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये शिल्पा शिंदेने संजय कोहली यांच्याविरोधातील आरोपांबाबत भाष्य केले. या पॉडकास्टमध्ये ती स्पष्टपणे म्हणाली की, 'मला हा शो सोडायचा होता म्हणून मी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरोधात तेव्हा खोटी तक्रार केली. त्यानंतर आमच्यात सेटलमेंट झाली, त्यांनी मला तीन महिन्यापासून बाकी असलेले माझे मानधन दिले. तर, मी त्यांना आश्वासन दिलं की मी या घटनेबद्दल परत कधीच काही बोलणार नाही. या सेटलमेंटनंतर मी अखेर शो सोडला.' हा पॉडकास्ट व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर ट्रॉलिंग होत आहे. काही सोशल मीडिया नेटकरी तिच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.

नवी दिल्लीस्थित ‘NCMIndia Council For Men Affairs’ या स्वयंसेवी संस्थेने आपल्या अधिकृत ‘X’ हँडलवरून मुंबई पोलिसांना टॅग करत शिल्पा शिंदेच्या अटकेची मागणी केली आहे. संस्थेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये पॉडकास्टमधील तिच्या वक्तव्याची क्लिप जोडण्यात आली असून, निर्मात्याविरुद्ध खोटा लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अनेक कलाकार या प्रकरणावरुन सोशल मिडियावर शिल्पावर नाराजी व्यक्त करत आहे. हिना खान, पूजा बेदी यांसारख्या अभिनेत्रींनी या प्रकाराचा आणि शिल्पाच्या वागण्याचा विरोध केला आहे.

या प्रकरणावर वाढत्या चर्चेनंतर शिल्पा शिंदेने स्वतःचे स्पष्टीकरणही दिले आहे. तिने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पॉडकास्टमधील तिच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. “मी कोणालाही स्पष्टीकरण देण्यासाठी आलेली नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. त्यामुळे चुकीची माहिती पसरवली जात आहे,” असे शिल्पाने स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT