शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार? Saam Tv
मनोरंजन बातम्या

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार?

चित्रपटाच्या शूटिंगच्या नावाखाली मढ बेटावरील खासगी बंगल्यांमध्ये वेश्या व्यवसाय आणि शॉर्ट पॉर्न व्हिडीओ शूट होत असल्याची माहिती प्राँपर्टी सेलच्या पोलिसांना मिळाली होती.

सूरज सावंत

मुंबई - पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणाऱ्या रॅकेट प्रकरणात गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षात सोमवारी रात्री उशिरा उद्योगपती व अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty पती राज कुंद्रा Raj Kundra याला अटक करण्यात आली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणातमुख्य सूत्रधार असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

चित्रपटाच्या शूटिंगच्या नावाखाली मढ बेटावरील खासगी बंगल्यांमध्ये वेश्या व्यवसाय आणि शॉर्ट पॉर्न व्हिडीओ शूट होत असल्याची माहिती प्राँपर्टी सेलच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या बंगल्यांवर छापे टाकले. काही टोळ्या तरुण मुलींना चित्रपटात मोठे काम देतो, असे सांगून अश्लील व्हिडीओमध्ये काम करून घेण्यात येत होते. पोलिसांनी या रॅकेटमधून २ मुलींची सुटका केली आहे. मुलींना नशामुक्ती केंद्रामध्ये पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, या आधी छाप्यात पोलिसांनी उमेश कामत, यासमीन बेग खान, प्रतिभा नलावडे, मोनू गोपालदास जोशी, भानुसूर्यम ठाकूर आणि मोहम्मद आसिफ यांना अटक केली होती. त्यात पुढे गहना वशिष्ठ आणि सागरिका शोना सुमन यांनाही अटक करण्यात आली होती.

हे देखील पहा -

फेब्रुवारी 2021 मध्ये घडलेल्या या गुन्ह्याचा पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर या संपूर्ण गुन्ह्यामागे मुख्य आरोपी उद्योगपती राज कुंद्रा याचा हात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार सोमवारी राज कुंद्रा याची चौकशी करून याला प्राँपर्टी सेलच्या पोलिसांनी अटक केली. आज राज कुंद्रा याला किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे. कुंद्राच्या अटकेनंतर पोलिस त्याच्या विरोधात काय पुरावे सादर करणार, तसेच कुंद्राच्या चौकशीत आता नेमकी कोणाची नाव समोर येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

लॉकडाऊनमध्येही रॅकेट सुरु

लॉकडाऊनच्या काळातही या पॉर्न रॅकेटचे काम जोरात सुरु होते. याच काळात अनेक अश्लिल चित्रपटांची शुटिंग करून हे व्हिडिओ विदेशात पाठवले जात होते. तेथून ते ओटीटी प्लँट फार्मवर अपलोड केले जात होते. तसेच 7 दिवसात याचा डाटा ही डिलिट करण्यात येत होता. ज्याने करून कुणी शोधण्याचा जरी प्रयत्न केला. तरी पोलीस मुख्य आरोपींपर्यंत पोहचू शकणार नाहीत. या रॅकेटच्या माध्यमातून एस्कॉर्ट सर्व्हिस किंवा वेश्या व्यवसायही केला जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. यापैकी काही मॉडेल्स आणि अन्य लोकांचा बॉलीवूडशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.

कोट्यावधी रुपयांची होती उलाढाल

यातील कलाकारांना व्हिडीओमागे मिळायचे लाखो रुपये गहनाला एका वहिडीओ मागे 8 ते 10 लाख रुपये मिळत असल्याचं तपासात समोर आलं होतं. यातूनच यात किती पैसा गुंतला होती याचा अंदाज बांधता येईल. यातील 2 ते 3 लाख कँमेरामन आणि कलाकार यांना दिले जायचे. तर कोट्यावधी रुपये यातून कुंद्रा यांना नफा मिळत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT