Sherlyn Chopra And Rakhi Sawant And Adil Khan Durrani Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sherlyn Chopra: राखी- आदिल प्रकरणात शार्लिनची उडी, म्हणते 'माझा भाऊ वाईट नाही...'

राखी सावंत आणि पती आदिल खान दुर्रानी यांच्या या सर्व प्रकरणात शर्लिन चोप्राने आदिलची बाजू घेतली आहे.

Chetan Bodke

Sherlyn Chopra: राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान दुर्रानी यांच्या लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. राखीने तिच्या पतीवर घरगुती हिंसाचाराचा व त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. या सर्व प्रकरणात शर्लिन चोप्राने आदिलची बाजू घेतली आहे. शर्लिनने गेल्या वर्षी राखीविरुद्ध बदनामी आणि लैंगिक छळाचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणात पोलिसांनी नुकतीच तिची चौकशी केली होती.

सध्या सुरू असलेल्या राखी-आदिलच्या वादात शर्लिनने या प्रकरणावर भाष्य केले आहे. यावर शार्लिनने राखी- आदिलवर आरोप करत दोघेही प्रसिद्धीत राहण्यासाठी हे करत आहेत. गुरुवारी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, शर्लिन चोप्राने राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान दुर्रानी यांच्यात सुरू असलेल्या भांडणावर तिचे मत शेअर केले.

शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत शार्लिन म्हणते, "राखी-आदिल या दोघांच्याही वादात मी काय बोलू?, पण त्याच्यासोबत वेळ घालवल्यानंतर तो एक साधा सरळ माणूस मला दिसला.पण माहित नाही तो या वादात कसा काय सापडला. मी आदिलला सुद्धा सांगितले की तो खूप चांगला दिसत असून तू तिच्यासोबत काय करत होता? मला असे वाटते की राखीने फक्त प्रकाशझोतात राहण्यासाठी अशा गोष्टी करू नयेत."

सोबतच पुढे शार्लिन म्हणते, "मी राखीच्या नवऱ्याला माझा भाऊ मानला आहे. माझ्या भावाच्या बाबतीत अशा गोष्टी ऐकणे मला कधीच बरे वाटत नाही. जो काही वाद आहे तो त्या दोघांमध्ये आहे आणि त्यांच्यातील वाद लवकरात लवकर संपावा अशी माझी इच्छा आहे."

राखी सावंतने अलीकडेच सांगितले होते की, आदिल खान दुर्राणीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याशी 'पॅच अप' करण्यास सांगितले होते. माध्यमांशी संवाद साधताना, राखीचा भाऊ राकेश सावंत यानेही आरोप केला होता की, ज्या दिवशी आईचे निधन झाले त्यादिवशी राखीला तिच्या पतीने मारहाण केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT