Pornography Case: शर्लिन चोप्राला क्राईम ब्रँचचे समन्स, आज होणार चौकशी Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pornography Case: शर्लिन चोप्राला क्राईम ब्रँचचे समन्स, आज होणार चौकशी

पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये अभिनेत्री मॉडेल शर्लिन चोप्रा नाव चर्चेत आहे. राज कुंद्रावर शर्लिन कडून अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आज अभिनेत्री शर्लिन चोप्राची मुंबई क्राईम ब्रँच कडून चौकशी करण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty पती राज कुंद्रा Raj Kundra हा १९ जुलैपासून पोर्नोग्राफी प्रकरणाच्या केस मुळे सध्या जेलमध्ये आहे. त्याची न्यायालयिन कोठडीमध्ये सुरू आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी सबळ पुरावे सापडल्याचं म्हटले जात आहे. त्याच्या पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये अभिनेत्री मॉडेल शर्लिन चोप्रा Sherlyn Chopra नाव चर्चेत आहे. राज कुंद्रावर शर्लिन कडून अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आज अभिनेत्री शर्लिन चोप्राची मुंबई क्राईम ब्रँच कडून चौकशी करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुन्हा एकदा अभिनेत्री शर्लिन चोप्राची मुंबई क्राईम ब्रँच कडून चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी शर्लिनला समन्स पाठवला आहे.

अभिनेत्री शर्लिन चोप्राची राज कुंद्रा केस मध्ये याआधीही चौकशी करण्यात आलेली आहे. शर्लिन ने सांगितल्यानुसार, या प्रकरणात पोलिसांकडे जबाब नोंदवणारी ती आहे. आता आज पुन्हा एकदा राज कुंद्राच्या अटकेनंतर शर्लिन चोप्राची चौकशी होणार असल्याचं समोर आले आहे.

ANI च्या ट्वीट नुसार, मुंबई पोलीस क्राईम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेल डिपार्टमेंट कडून अभिनेत्री-मॉडेल शर्लिन चोप्राला समन्स पाठवण्यात आला आहे. तिला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहावे लागणार आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! परीक्षेच्या काही मिनिटांआधी MSc नर्सिंगची परीक्षा रद्द, अचानक नेमकं काय घडलं?

कौटुंबिक वाद शिगेला पोहोचला, संतापलेल्या पत्नीनं नवऱ्याला 'नको तेथे मारलं', अन्...; मुंगेरमधील धक्कादायक घटना

Maharashtra News Live Update: राजूर हत्याकांड प्रकरण; दोन पोलीस निरीक्षकांच निलंबन

राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून नवनीत राणांना उमेदवारी? तटकरेंनी एका वाक्यात विषय संपवला

Akkalkot : अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला गेलाय? मग न विसरता फिरा 'हे' ५ पिकनिक स्पॉट्स

SCROLL FOR NEXT