Sajid Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sajid Khan: साजिद खान अनेक महिलांसोबत गैरवर्तन, घाणेरडे चाळे करायचा; शार्लिन चोप्राचा गंभीर आरोप

त्याच आधारावर अनेक महिलांसोबत घडलेल्या घटनेवर अखेर आवाज उठवला आहे. तो बऱ्याच महिलांसोबत अश्लिल कृत्ये करत संपर्क साधायचा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अभिनेत्री शार्लिन चोप्राने चित्रपट निर्माता साजिद खानविरोधात मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार दाखल केली आहे. 2005 मध्ये तिच्यासोबतच्या घडलेल्या घटनेबाबत तिने ही तक्रार नोंदवली आहे.

या सर्व मुद्द्यावर शार्लिन चोप्राने एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली. त्यावेळी ती म्हणाली, काल निर्माता साजिद खान विरोधात जुहू पोलीस ठाण्यात मी तक्रार नोंदवली आहे. लैंगिक छळ, गुन्हेगारी संबंधित ही तक्रार दाखल केली आहे. २००५ मध्ये घडलेल्या गुन्ह्यासंबंधित पोलिसांना सांगितले. एवढ्या जुन्या प्रकरणात तक्रार नोंदवण्यासाठी इतका का वेळ लागला, असा प्रश्न पोलिसांनी मला विचारला. मोठ्या निर्मात्यांविरुद्ध बोलण्याची माझी हिंम्मत होत नव्हती.

२०१८ पासून सुरू झालेल्या #MeToo संबंधित बऱ्याच अभिनेत्रींनी आपल्या आयुष्यात घडलेल्या गुन्ह्याबद्दल सांगत आहेत. त्याच आधारावर अनेक महिलांसोबत घडलेल्या घटनेवर अखेर आवाज उठवला आहे. तो बऱ्याच महिलांसोबत अश्लिल कृत्ये करत संपर्क साधायचा. बऱ्याच महिलांसोबत गैरवर्तन व घाणेरडे चाळे करून बोलायचा. महिलांसोबत घडलेल्या घटनांना वाचा फोडण्याची तेव्हा कोणी हिंमत केली नव्हती, पण आता बऱ्याच महिलांची हिंमत पाहता त्या घटनेला वाचा फोडावी, असे मला वाटत आहे.

'कोणत्याही मोठ्या व्यक्तीने लैंगिक शोषणासारखा गुन्हा जर केला असेल, तर त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करत त्याच्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे. माझ्या मते साजिद खानला हार्वे विस्टीनसारखी कारावासाची शिक्षा द्यायला हवी, हार्वे विस्टीनने अनेक वर्षांचा कारावास भोगला. तसेच मला भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे की, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यालाही शिक्षा सुनावली जाईल,' असे ती म्हणाली.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

GK: स्मशानभूमीतून घरी परतल्यानंतर आपण आंघोळ का करतो?

Parali News : पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

Mumbai School Bus : माणुसकी! मुंबईला पावसाचा तडाखा, स्कूल बस अडकली पाण्यात, धो धो पावसात पोलिसांनी मुलांना वाचवले

Tapola Tourism : महाबळेश्वरपासून हाकेच्या अंतरावर वसलय हिडन हिल स्टेशन पाहा काश्मिरसारखे सौंदर्य क्षणात

SCROLL FOR NEXT