Shehnaaz Gill Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shehnaaz Gill: 'आज आम्ही थोडक्यात वाचलो...'; विमानातील धक्कादायक अनुभवाचा प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ

Shehnaaz Gill: शहनाज गिलच्या विमानाला प्रवासादरम्यान अचानक जोरदार टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. घाबरलेल्या शहनाजने ‘वाहेगुरु’चा जप केला. मुंबईत सुरक्षित लँडिंगनंतर तिने चाहत्यांसोबत अनुभव शेअर केला.

Shruti Vilas Kadam

Shehnaaz Gill: अभिनेत्री आणि गायिका शहनाज गिल सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील खास क्षणांपासून ते कामाशी संबंधित अपडेट्सपर्यंत अनेक गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करते. मात्र, यावेळी तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे तिचे चाहते काहीसे चिंतेत पडले. विमान प्रवासादरम्यान शहनाजला अचानक टर्ब्युलन्सचा अनुभव आला. विमानाला हवेत जोरदार धक्के बसल्याने प्रवासादरम्यान काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

विमानाला हवेत बसले जोरदार धक्के

शहनाज गिलने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर विमान प्रवासाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विमानाला टर्ब्युलन्स येताना दिसत आहे. अचानक विमानाला धक्के बसू लागल्यानंतर शहनाज ‘वाहेगुरु, वाहेगुरु’ असा जप करताना ऐकू येते. या प्रसंगामुळे ती घाबरल्याचे तिच्या व्हिडीओमधून दिसते. हा व्हिडीओ शेअर करताना शहनाजने आपल्या भावना व्यक्त केल्या. तिने लिहिले, “आज आम्ही कसेबसे वाचलो... आम्ही सुरक्षितपणे लँड झालो, याबद्दल मी कृतज्ञ आहे. धन्यवाद, वाहेगुरु.” तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली.

भाऊ शहबाजही होता सोबत

या विमान प्रवासात शहनाजसोबत तिचा भाऊ शहबाज बदेशा देखील होता. व्हिडीओमध्ये दोघेही विमानात दिसत आहेत. टर्ब्युलन्समुळे काही काळ भितीदायक वातावरण निर्णाण झालं असलं तरी अखेर विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे किंवा कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. विमान प्रवासादरम्यान टर्ब्युलन्स होणे ही असामान्य घटना नाही. हवेच्या प्रवाहात होणाऱ्या बदलांमुळे विमानाला अचानक धक्के जाणवू शकतात. अशा परिस्थितीत प्रवाशांना सीटबेल्ट लावून ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

'बिग बॉस १३'मुळे मिळाली लोकप्रियता

शहनाज गिलला ‘बिग बॉस १३’ या रिअ‍ॅलिटी शोमधून देशभरात मोठी लोकप्रियता मिळाली. शोमधील तिचा उत्साही स्वभाव आणि मनमोकळे व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. त्यानंतर तिने अन्य चित्रपटांमधून काम करत आपली छाप सोडली. शहनाज अलीकडेच ‘इश्कनामा’मध्ये दिसली. तिने गिप्पी ग्रेवालसोबत ‘सिंग व्हर्सेस कौर २’ या पंजाबी चित्रपटातही काम केले आहे. आता ती दिलजीत दोसांझ आणि सोनम बाजवा यांच्यासोबत ‘रन्ना च धन्ना’ या आगामी पंजाबी चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समृद्धी महामार्ग बनतोय गांजा तस्करीचा मार्ग? दोन ट्रकमधून 350 किलो गांजा जप्त, वाशिम पोलिसांची मोठी कारवाई

Maharashtra News Live Update: प्राचार्य डॉ बब्रुवाहन रोंगे यांनी भरला पुणे शिक्षक मतदार संघातील उमेदवारीसाठी उमेदवारी अर्ज....

सासू सासऱ्यांचे घर, जमीन, मालमत्ता सुनेला मिळू शकते का? कायदा काय सांगतो, जाणून घ्या

Rajgira Benefits : फक्त उपवासालाच नाही! सलग १४ दिवस राजगिरा खाऊन पाहा; आरोग्याला मिळतील हे आश्चर्यकारक फायदे

सलग ३० दिवस चेहऱ्यावर गुलाब पाणी लावल्याने त्वचेवर होतात हे चमत्कारिक बदल!

SCROLL FOR NEXT