Shefali Jariwala SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shefali Jariwala : पोस्टमार्टमचं व्हिडिओ रेकॉर्ड अन् १४ जणांचे जबाब; शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट

Shefali Jariwala Death : अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यू प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे. आता या संबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'कांटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे (Shefali Jariwala) 27 जूनला रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शेफाली जरीवाला 'बिग बॉस 13'मध्ये देखील झळकली होती. शेफालीच्या निधनानंतर मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास घेत आहेत. यासंबंधित आता मोठी अपडेट समोर आली आहे.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, शेफाली जरीवालाचे पोस्टमार्टम कूपर रुग्णालयात करण्यात आले. पोस्टमार्टमचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. पोस्टमार्टम 5 डॉक्टरांच्या टिमने करण्यात आले आहे. त्याचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता आहे. शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणात पोलीस देखील तपास करत आहेत. या प्रकरणी 14 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यात शेफालीचे कुटुंबीय, घरातील कर्मचारी आणि जवळचे मित्र यांचा समावेश आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी शेफाली आणि तिचे कुटुंब ज्या मेडिकल स्टोअरमधून औषधे खरेदी करायचे त्या मेडिकल स्टोअरच्या फार्मासिस्टचा जबाब देखील नोंदवला आहे. तसेच पोलिसांनी तिच्या इमारतीभोवतीचे 7 सीसीटीव्ही फुटेज देखील घेतले आहेत. शेफालीच्या घरी कोण आले आणि कोण गेले या सर्वाची माहिती पोलीस घेत आहेत. वैद्यकीय अहवालानुसार असे सांगण्यात आले आहे की, शेफालीचा मृत्यू कमी रक्तदाब, हृदयविकाराचा झटका यामुळे झाला आहे.

शेफाली जरीवालाने वयाच्या 42व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. शेफाली अभिनयासोबत मॉडेलिंग देखील करायची. शेफाली जरीवाला 'कांटा लगा' या गाण्यामुळे खूप प्रसिद्ध झाली. ती कायमच टीव्ही शो, कार्यक्रम आणि जाहिरातीमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे तिच्या अचानक झालेल्या निधनामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BP Medicines: BP नॉर्मल आला म्हणून गोळी बंद केली? ठरू शकतं महागात; डॉक्टरांनी सांगितलं हार्ट अटॅकचा धोका वाढतो

Maharashtra News Live Update: सोलापुरात 1 कोटी 45 लाख रुपयांचे गांजाची रोपे पोलिसांनी केली जप्त

Navratri 2026 : दुष्काळामुळे महाराष्ट्रात दांडिया रद्द? मराठी एकीकरण समितीची मागणी

Plane Crash: उड्डाण घेताच लष्कराचे विमान कोसळलं, ६ जणांचा मृत्यू

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! जुनी पेन्शनचा मार्ग मोकळा, अर्जाची शेवटची तारीख समोर

SCROLL FOR NEXT