Sonakshi Sinha and Shatrughan Sinha Saam TV
मनोरंजन बातम्या

Shatrughan Sinha News : "असा विवाह पहिल्यांदाच नाही झालाय...", सोनाक्षी- झहीरला लग्नावरून ट्रोल करणाऱ्यांवर शत्रुघ्न सिन्हा भडकले

Shatrughan Sinha On Sonakshi Interfaith Marriage : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला सोशल मीडियावर आंतरजातीय विवाहामुळे प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. आता त्या ट्रोलिंगवर शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

Chetan Bodke

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी २३ जूनला रजिस्टर्ड मॅरेज केले. सोनाक्षीने वडिलांना लग्नाविषयी कोणतीही कल्पना दिली नव्हती त्यामुळे तिचे वडील तिच्यावर नाराज होते. पण त्यानंतर त्यांनी लग्नाला मान्यता दिली. अभिनेत्रीला सोशल मीडियावर आंतरजातीय विवाहामुळे प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. आता त्या ट्रोलिंगवर शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी ट्रोलर्सचे स्पष्ट कानउघडणी केलेली आहे.

टाईम्स नाऊला शत्रुघ्न सिन्हा यांनी मुलाखत दिली आहे. ते म्हणाले, "मी माझ्या आयुष्यात अनेक संकटांना तोंड दिलेलं आहे. त्यासमोर हे संकट काहीही नाही. याविषयी काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आंतरजातीय विवाहाबद्दल आमच्या कुटुंबात कोणताही वाद नव्हते. नॉर्मल कुटुंबाप्रमाणेच आम्हीही सोनाक्षी- झहीरच्या लग्नामध्ये सामील झालो होतो."

सोनाक्षीच्या लग्नात लव सिन्हाही उपस्थित नव्हता. याबाबतही त्यांनी भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की, "हा कौटुंबिक वाद आहे, हे कुटुंबातच राहू द्या. कोणत्या कुटुंबात वाद नसतात ? काही मुद्द्यावरून मतभेद किंवा वादविवाद होऊ शकतो. पण तरीही आमचं एक कुटुंब आहे आणि ते कोणीही तोडू शकत नाही." अशी प्रतिक्रिया शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली.

सोनाक्षीला आंतरजातीय विवाहावरुन ट्रोल करणाऱ्यांनाही शत्रु्घ्न यांनी चांगलंच सुनावलं आहे. "आंतरजातीय विवाह पहिल्यांदाच केलेलं नाही. माझ्या फॅमिलीबद्दल चुकीचं बोलेलं मी खपून घेणार नाही. सोनाक्षीच्या आनंदात मी एक वडील म्हणून आनंदात सहभागी आहे. तिचा आनंद तोच आमचा आनंद. तिला आनंदी पाहिलं की आम्हाला आनंद मिळतो. मला विश्वास आहे, झहीर नेहमीच तिला आनंदीत ठेवेल." सोनाक्षी आणि झहीर या दोघांनीही एकमेकांना ७ वर्षे एकमेकांना डेट केले. डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी आणि झहीरची ओळख सलमान खानमुळे झाली आहे. दोघांनीही डबल XL चित्रपटात एकत्र काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

How To Increase Stamina : शरीराची ताकद वाढविण्यासाठी काय खावे?

Nikki Tamboli: बाईsss... निक्कीचे मेकअप साहित्य येतं लंडनहून, कोणत्या प्रॉडक्टची किंमत किती?

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी करताना झालेली चूक दुरुस्त करायचीये? लाडक्या बहिणींनो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

Rajya Sabha election : शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT