Munjya Trailer Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Munjya Trailer : ‘मुंज्या’चा हॉरर कॉमेडी ट्रेलर रिलीज, अधुरी प्रेम कहाणी होणार का पूर्ण?

Munjya Trailer Out : आदित्य सरपोतदार दिग्दर्शित हॉरर कॉमेडी ‘मुंज्या’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झालेला आहे.

Chetan Bodke

सध्या सोशल मीडियावर आदित्य सरपोतदार यांच्या ‘मुंज्या’ चित्रपटाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा होत आहे. नुकताच हा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झालेला आहे. सध्या हा ट्रेलर चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे या चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हा हॉररपट येत्या ७ जूनला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

हॉरर कॉमेडी ट्रेलरच्या सुरुवातीला एक जंगल दिसत आहे. त्या जंगलामध्ये एक शापित ठिकाण आहे. त्या ठिकाणी एकही झाड नसते. तिथे फक्त मुंज्याची आत्मा असते. ट्रेलरमध्ये मुंज्या आणि मुन्नीची लव्हस्टोरी दाखवली आहे. दोघांनाही लग्न करायचे असते. पण त्यांची लग्न करण्याची ईच्छा अपूर्ण राहते. कारण मुंज्याचा लग्नापूर्वीच मृत्यू होतो. त्याच्या अस्थी जिथे पुरलेल्या असतात, त्या भागातील झाडं शापित होतात. म्हणून त्या जंगलातील काही भाग शापित असतो आणि तिथे एकही झाड नसते.

जंगलातील त्या शापित भागातील झाडाजवळ गेलेल्या मुलाला मुंज्या झपाटतो. आणि त्याच्याबरोबर तो सुद्धा मुन्नीला शोधायला शहरात येत असल्याचं ट्रेलरमध्ये दाखवलं आहे. शहरात आलेल्या त्या मुलाला आणि मुंज्याला शहरात आल्यावर मुन्नी भेटते का? आणि त्यांची अधुरी प्रेम कहाणी कशी पूर्ण होणार ? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला चित्रपट पहिल्यावरच कळेल.

हॉरर कॉमेडी चित्रपटाची सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘स्त्री’ चित्रपटाचे निर्माते मॅडॉक फिल्म्सने केली आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अभय वर्मा, शर्वरी वाघ, मोना सिंग आहेत. तर सुहास जोशी, रसिका वेंगुर्लेकर, भाग्यश्री लिमये आणि शर्वरी वाघ हे मराठमोळे सेलिब्रिटी ही प्रमुख भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Agriculture Scheme: जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी सरकार करेल मदत; कसा कराल अर्ज, काय आहे पात्रता?

Akola Police : दहशत माजविणाऱ्यांची उतरविली मस्ती; पोलिसांनी शहरातून काढली धिंड

Maharashtra Live News Update: मालेगाव पोलिसांची कारवाई! 1 लाख 40 हजार रुपयांचा गांजा जप्त, तीन महिला अटकेत

कोल्हापूर स्पेशल! CSMT ते कोल्हापूर दरम्यानचा प्रवास होणार अतिजलद; जाणून घ्या किती असेल रेल्वे तिकीट, अन् थांबे

Olya Naralachi Vadi Recipe: गूळ घालून बनवा ओल्या नारळाच्या वड्या, फक्त 10 मिनिटांत होईल रेसिपी

SCROLL FOR NEXT