Sangee Movie Poster PR
मनोरंजन बातम्या

Sangee : नववर्षी प्रेक्षकांसाठी मित्रांची धमाल घेऊन येणार ‘संगी’

Sangee Movie : नववर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तसेच मराठी मधील आणखी एका नवीन हटके चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट मैत्रीवर आधारित सजून नववर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आयुष्यात आलेल्या अनेक खडतर प्रसंगात कुटुंबासोबत खंबीरपणे पाठीशी उभे राहतात ते म्हणजे मित्र. परिस्थिती कोणतीही असो त्याला हसतमुखाने सामोरे जाण्याची हिम्मत अशाच मित्रांकडून येते. अशाच मित्रांवर आधारित नवा चित्रपट नवीनवर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मित्र आणि त्यांचा कल्ला असलेला हा चित्रपट सर्वांसाठी नक्कीच खास असेल.

अर्मोक्स फिल्म्स आणि यंत्रणा फिल्म्स निर्मित , सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि सत्यम ज्वेलर्स प्रस्तुत ‘संगी’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित कुलकर्णी यांनी केले असून लेखन थोपटे विजयसिंह सर्जेराव यांचे आहे. रोहन भोसले, अरुण प्रभुदेसाई, पिंटू सॉ, मोनिका प्रभुदेसाई, प्रतीक ठाकूर, सुमित कुलकर्णी हे 'संगी'चे निर्माते आहेत. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि राहुल किरणराज चोप्रा सहनिर्माते आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून यात शरीब हाश्मी, संजय बिष्णोई, श्यामराज पाटील, विद्या माळवदे आणि गौरव मोरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

संगी म्हणजेच मैत्री त्यामुळे याचे कथानक मैत्रीभोवती फिरणारे आहे. मात्र पोस्टरमध्ये तीन मित्र दिसत असतानाच काही नोटाही दिसत आहेत. त्यामुळे आता पैसे आणि मैत्री यांचा एकमेकांशी काय संबंध असणार हे जाणून घेण्यासाठी १७ जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. एकंदरच हलकीफुलकी, हास्य आणि मनोरंजनाने भरलेली कथा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवणारा असेल, हे नक्की !

चित्रपटाचे दिग्दर्शक सुमित कुलकर्णी म्हणाले, " 'संगी' हा फक्त एक चित्रपट नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यातील हास्यरसाचा अनुभव आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असला तरी घरातील प्रत्येकाने हा चित्रपट आपल्या मित्रपरिवारासोबत आवर्जून पाहावा. हा चित्रपट अनेकांना नॉस्टॅल्जिक बनवेल. 'संगी' विनोदी चित्रपट असला तरी यात भावनाही दडलेल्या आहेत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime: धक्कादायक! शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर हल्ला, कल्याणमध्ये खळबळ

Shukra Gochar 2025: 'या' ३ राशींना होणार भलं; नोकरीत बढती आणि व्यवसायत होईल भरभराट

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाची रिमझिम सुरूच! कोकणासह 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

Pakistan Airstrikes : पाकिस्तानचा पुन्हा एअरस्ट्राईक, खेळाडूंवर टाकले बॉम्ब, ८ अफगाण खेळाडूंचा मृत्यू

SCROLL FOR NEXT