Famous Actor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actor : मळके कपडे, धड उभंही राहता येईना; प्रसिद्ध अभिनेत्याला नेमकं झालं तरी काय? व्हायरल VIDEO नं चाहते चिंतेत

Sharad Kapoor : बॉलिवूड अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे चाहत्यांमध्ये अभिनेत्याच्या तब्येतीची चिंता व्यक्त होताना दिसत आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्याचा भावुक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

चार पाळीव कुत्र्यांना निरोप देताना अभिनेत्याला अश्रू अनावर

अभिनेत्याच्या तब्येतीची चाहत्यांना चिंता

बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता शरद कपूर सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. अभिनेता शाहरुख खान आणि हृतिक रोशन यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलेल्या शरद कपूर यांचा एक भावुक करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते आपल्या चार पाळीव कुत्र्यांचा निरोप देताना दिसत आहे. आपल्या लाडक्या श्वानांना स्वतःपासून दूर करताना त्याला अश्रू अनावर झाले. हा व्हिडीओ पाहून चाहतेही चिंतेत पडले असून सोशल मीडियावर अनेकजण त्याच्याबद्दल काळजी व्यक्त करत आहेत. शरद कपूर यांनी 'जोश' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर केले. एकेकाळी आपल्या फिटनेस आणि व्यक्तिमत्त्वामुळे चर्चेत असलेला अभिनेता या व्हिडीओमध्ये वेगळ्याच अवस्थेत दिसत असल्याने चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीबद्दलही चिंता व्यक्त केली आहे.

कुत्र्यांचा निरोप घेताना शरद कपूर भावुक

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शरद कपूर आपल्या चार पाळीव कुत्र्यांना प्राणी कल्याण केंद्रात पाठवताना दिसत आहेत. या चारही कुत्र्यांशी त्याचे अतिशय घट्ट नाते आहे. त्यामुळे त्यांना स्वतःपासून दूर करताना त्यांना भावना अनावर झाल्या. कुत्र्यांना निरोप देताना त्याच्या चेहऱ्यावरील दुःख आणि डोळ्यांतील अश्रू पाहून अनेक चाहत्यांचेही मन हेलावले.

शरद कपूर यांनी कुत्र्यांना आश्रयकेंद्रात का पाठवलं?

शरद कपूर यांनी आपल्या चारही पाळीव कुत्र्यांना कायमचे सोडलेले नाही. सध्या त्याच्या घरातील काही वैयक्तिक आणि कौटुंबिक परिस्थितींमुळे त्यांना सांभाळणे कठीण होत असल्याचे सांगितले जात आहे.प्राणी कल्याण कार्यकर्त्या आणि मुंबईतील बेजुबान पब्लिक वेल्फेअर ट्रस्टच्या (Bejubaan Public Welfare Trust) संस्थापक हेमा चौधरी यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, शरद कपूर सध्या काही शारीरिक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करत आहे. त्यामुळे त्याला स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.याशिवाय, त्याच्या कुटुंबात नुकतेच एका नव्या बाळाचे आगमन झाले आहे. त्यामुळे घरातील जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. चार कुत्र्यांची नियमित देखभाल करण्यासाठी आवश्यक असलेली मदत आणि काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध नसल्याने कुटुंबासमोर अडचण निर्माण झाली.अशा परिस्थितीत कुत्र्यांची योग्य काळजी घेता यावी, यासाठी त्यांना तात्पुरते मुंबईतील YODA या प्राणी कल्याण केंद्रात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर आणि शरद कपूर यांना त्यांचा सांभाळ करणे शक्य झाल्यानंतर त्यांना पुन्हा घरी आणण्याचा विचार आहे.

शरद कपूरचे भावुक वक्तव्य

या संपूर्ण व्हिडीओमधील सर्वात भावुक क्षण म्हणजे शरद कपूरने आपल्या पाळीव कुत्र्यांबद्दल व्यक्त केलेल्या भावना. त्यांना स्वतःपासून दूर ठेवणे किती कठीण आहे, हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, "सध्या माझ्या घरातही काही अडचणी आहेत. पण जेव्हा माझा नवीन बंगला तयार होईल, तेव्हा मी YODA ला माझी ही बाळं परत देण्याची विनंती करेन. कारण मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही." कुत्र्यांनाही आपल्यापासून दूर गेल्यानंतर दुःख होईल, अशी भीती त्याने व्यक्त केली. व्हिडीओत अभिनेते नीट उभे राहू शकत नाही आणि चालण्यासाठी वॉकरचा वापर करत असल्याचे दिसत आहे.आपल्या दुखापतीबद्दल बोलताना शरद म्हणाले, "ही दुखापत मला अपघाताने झाली. मी फुटबॉल खेळत होतो आणि माझ्या हाडाला एक लहान तडा गेला. पण देवाचे आभार. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे आभार..."

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी शरद कपूरच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. मात्र, या प्रकरणामागील खरी परिस्थिती समजून न घेता अभिनेत्याला ट्रोल करू नये, असे आवाहन हेमा चौधरी यांनी केले आहे. हेमा चौधरी यांनी सांगितले की, त्या शरद कपूरला जवळपास तीन दशकांपासून ओळखतात. त्याच्या सध्याच्या परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याची भेट घेतली. त्यावेळी कुटुंबाला नेमक्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, हे त्यांना समजले.कुत्र्यांना कायमचे सोडून देण्याचा हा निर्णय नसून, सध्याच्या परिस्थितीत त्यांची योग्य काळजी घेण्यासाठी केलेली तात्पुरती व्यवस्था आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

अभिनेता शरद कपूर कोण?

शरद कपूर हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जोश' या चित्रपटामुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन मुख्य भूमिकेत होते. आपली उंच शरीरयष्टी, वेगळे व्यक्तिमत्त्व आणि प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स यामुळे त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

America: अमेरिकेत अचानक 'ग्राउंड स्टॉप', ४ तास एकही विमानाने उड्डाण घेतलं नाही; नेमकं कारण काय?

Kitchen Hacks : मिरची कापताच हातांची होतेय आग? साबण नाही, तर 'या' सोप्या उपायाने मिनिटांत जळजळ होईल कमी

Maharashtra News Live Update: BMC ची वनक्षेत्र आणि संरक्षित झोपडपट्टी परिसरात टॉवर उभारण्यास परवानगी

Pune : "तुम्हाला घरपोच दारू मिळेल" होम डिलिव्हरीचे आमिष दाखवून ग्राहकांना लाखोंचा गंडा

EPFO Alert : नोकरदारांनो लक्ष द्या! ऑक्टोबरचा PF जमा करण्याची शेवटची तारीख ठरली! लगेच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT