मेहुणा तुरुंगात, बहीण अडचणीत; कुटुंब सोडून शमिता बिग बॉसमध्ये कशी?  Saam Tv
मनोरंजन बातम्या

मेहुणा तुरुंगात, बहीण अडचणीत; कुटुंब सोडून शमिता बिग बॉसमध्ये कशी ?

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चौकशी चालू आहे, तिचा पती राज कुंद्रा न्यायालयीन कोठडीत आहेत. अशा कठीण काळात कुटुंब सोडून बिग बॉसमध्ये येणे हा शमितासाठी मोठा निर्णय असणार होता. परंतु बिग बॉसच्या मंचावर आल्यावर, शमिता ने ती शो मध्ये का आली हे देखील सांगितले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टीने Shamita Shetty बिग बॉस ओटीटीमध्ये Big Boss OTT धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. शमिता बिग बॉसबद्दल बऱ्याच बातम्यांमध्ये चर्चेत आहे. मात्र, एकीकडे शमिता जिथे बिग बॉसमध्ये आली आहे, पण तिचे कुटुंब एका कठीण टप्प्यातून जात आहे. शमिताचे मेहुणे आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीची Shilpa Shetty चौकशी चालू आहे, तिचा पती राज कुंद्रा Raj Kundra न्यायालयीन कोठडीत आहेत. अशा कठीण काळात कुटुंब सोडून बिग बॉसमध्ये येणे हा शमितासाठी मोठा निर्णय असणार होता. परंतु बिग बॉसच्या मंचावर आल्यावर, शमिता ने ती शो मध्ये का आली हे देखील सांगितले आहे.

हे देखील पहा-

शमिता शेट्टीने बिग बॉसमध्ये अशी प्रतिक्रिया दिली की, शमिता म्हणाली- 'वेळ चांगली आणि वाईट असेल, तेव्हा आपण आपण श्वास घेणं नाही थांबवत. मग आपण काम का सोडले पाहिजे? खरं सांगायचं तर, बिग बॉसची ऑफर माझ्याकडे खूप पूर्वी आली होती. त्यावेळेस वचन Commitment दिले होते. मग त्यानंतर बरेच काही घडले आणि मला वाटले की कदाचित यावेळी बिग बॉसच्या घरात जाणे योग्य होणार नाही. पण मी एक वचन दिले होते म्हणून आले. पुढे ती एक बार जो मैं कमिटमेंट करती हूं तो मैं खुद की भी नहीं सुनती.' असे म्हणाली.

यावर करण जोहर Karan Johar शमिताला म्हणला की, आपण वाईट काळ विसरू आणि येणाऱ्या चांगल्या काळाची वाट पाहू.

अभिनेत्री शमिता दुसऱ्यांदा बिग बॉसमध्ये आली आहे. शमिता शेट्टी यापूर्वी बिग बॉस 3 मध्ये दिसली होती. आता शमिताला पुन्हा एकदा या शोमध्ये पाहण्यासाठी तिचे चाहते फार उत्सुक आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT