Shahrukh Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Delhi Car Accident: दिलदार किंगखान! दिल्ली अपघातातील मुलीच्या कुटूंबियांना शाहरुख करणार मदत, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

या भीषण अपघातात तरुणीला जीव गमवावा लागल्याने देशभरात हळहळ व्यक्त केली जात असतानाच बॉलिवूडचा किंग शाहरुख खान या मुलीच्या कुटूंबियांच्या मदतीला धावला आहे.

Gangappa Pujari

Shahrukh Khan: नववर्षाच्या सुरूवातीलाच दिल्लीमधील भीषण अपघाताच्या घटनेने संपूर्ण देशभरात खळबळ माजली होती. दिल्लीच्या कंझावाला भागात बलेनो कारने तरुणीला तब्बल १३ किमी फरफटत नेले होते. ज्यामध्ये अंजलीचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्यू पावलेली मुलगी घरातील एकमेव कमावती होती. तिच्या घरात आजारी आई आणि दोन भावांची जबाबदारी तिच्यावर होती. (Delhi Car Accident)

या भीषण अपघातात तरुणीला जीव गमवावा लागल्याने देशभरात हळहळ व्यक्त केली जात असतानाच बॉलिवूडचा किंग शाहरुख खान या मुलीच्या कुटूंबियांच्या मदतीला धावला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शाहरुख खान हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि आव्हानात्मक भूमिकांनी त्याने सिने जगतात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. शाहरुख त्याच्या अभिनयाइतकाच त्याच्या दिलदारपणासाठीही ओळखला जातो. शाहरुख स्वतःच्या एनजीओमार्फत गरजूंची मदत करत असतो. आता शाहरुख दिल्लीमध्ये अपघातात मृत्यू पावलेल्या अंजली सिंगच्या कुटूंबियांच्या मदतीला धावला आहे.

शाहरुख खानच्या मीर फाऊंडेशनकडून अंजली सिंगच्या कुटूंबियांना मदत केली जाणार आहे. अंजली सिंग तिच्या घरातील कमावती सदस्य असल्याने शाहरुख खानच्या मीर फाऊंडेशनकडून तिच्या आईच्या आरोग्याचाही खर्च केला जाणार आहे. याबद्दलची माहिती सोशल मीडियावरुन समोर आली आहे.

शाहरुखने (Shahrukh Khan) अंजलीच्या कुटूंबियांना केलेल्या आर्थिक मदतीचा आकडा अद्याप समोर आला नसला तरी शाहरुख खानच्या या मदतीचे सोशल मीडियावरुन कौतुक होताना दिसत आहे. दरम्यान, शाहरुख खानची मीर फाऊंडेशन ही त्याचे वडील मीर ताज मोहम्मद खान यांच्या नावाने सुरू करण्यात आली आहे. ज्यामाध्यमातून गरजूंना मदत केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

SCROLL FOR NEXT