Suhana Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suhana Khan Video : शाहरुख खानची मुलगी सुहाना रात्री उशिरा 'या' मुलासोबत, काय आहे नेमकं प्रकरण?

सुहाना खान सध्या खूप चर्चेत आहे. लवकरच सुहाना रुपेरी पडद्यावर जबरदस्त एन्ट्री करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानची(Shahrukh Khan) लाडकी मुलगी सुहाना खान(Suhana Khan) सध्या खूप चर्चेत आहे. लवकरच सुहाना रुपेरी पडद्यावर जबरदस्त एन्ट्री करणार आहे. पण तिच्या डेब्यूशिवाय सुहाना तिच्या लूकमुळे देखील चर्चेत असते. अलीकडेच सुहाना अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नातू अगस्त्य नंदासोबत दिसली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, सुहाना आणि अगस्त्यमध्ये काय सुरू आहे हे नेटकरी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

सुहाना खान नुकतीच श्वेता बच्चन आणि तिचा मुलगा अगस्त्य नंदासोबत दिसली. सुहाना खान मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर ब्लॅक क्रॉप टॉप आणि ब्लू कलर बॅगी जीन्समध्ये दिसली. सुहानाने केसांचा बन बनवला होता आणि या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. माहितीनुसार, सुहाना खानने श्वेता बच्चन आणि तिचा मुलगा अगस्त्य नंदासोबत डिनरसाठी गेली होती.

त्याचबरोबर, श्वेता बच्चनच्या लूकबद्दल बोलायचे तर ती स्काय ब्लू टॉप आणि जीन्समध्ये, मोकळ्या केसांमध्ये दिसली. तर अगस्त्याने काळ्या रंगाचा स्वेट-शर्ट आणि जीन्समध्ये होता. अगस्त्य आणि सुहानाचा आउटफिट बर्‍याच प्रमाणात जुळत होता. मात्र, रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना या स्टार्सनी एकमेकांपासून काही अंतर राखण्याचा प्रयत्न केला. या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर तिफन व्हायरल होत आहेत.

सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांच्याबद्दल सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अटकळी लावल्या जात आहेत,त्याचसोबत, आता दोघेही लवकरच 'द आर्चीज' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. आता या चित्रपटाच्या त्याच्या ट्रेलरची चाहते प्रतीक्षा करत आहे. चित्रपटाची कथा 'आर्ची' या प्रसिद्ध कॉमिक्सवर आधारित असेल. जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूरही या चित्रपटाद्वारे सिनेविश्वात पदार्पण करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT