kashiram chinchay
kashiram chinchay  saamtv
मनोरंजन बातम्या

'वेसावची पारू'चा पिता हरपला; शाहीर काशिराम चिंचय यांचे दुःखद निधन!

श्रेयस सावंत

मुंबई : सुप्रसिद्ध लोकशाहीर आणि पारंपरिक कोळीगीतांचा बादशहा अशी ओळख असलेले शाहीर काशीराम लक्ष्मण चिंचय (Kashiram Chinchay) यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी हेमा, मुलगा सचिन आणि तीन विवाहित कन्या असा परिवार आहे. गेले काही दिवस ते आजारी होते. उपचारासाठी त्यांना आधी अंधेरी येथे ब्रह्मकुमारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पण, अधिक उपचारांची गरज असल्याने त्यांना केईएम हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.

हे देखील पहा :

तेथे उपचार घेत असताना आज पहाटे त्यांची ज्योत मालवली. यांनी मागील पाच दशकं कोळी आगरी पारंपरिक गाण्यांचा ठेका अख्या सातासमुद्रापार केला. जात धर्म प्रांत या बाहेर जाऊन त्यांनी निर्माण केलेल्या कोळी गीतांच्या संगीताच्या ठेक्यावर सगळ्यांना नाचायला लावले. वेसावकर आणि मंडळी या सुप्रसिद्ध कलापथकाद्वारे व्हीनस म्युझिक कंपनीतर्फे निर्मिती केलेले सर्वच्या सर्व अल्बम्स गाजले. वेसावची पारू, दर्या भरला असे अनेक अल्बम आजही सुप्रसिद्ध आहेत. वेसावकरांची कमाल, हिरोंची धमाल या अमिताभ बच्चन (सादरकर्ते सुदेशजी भोसले) आणि काशीराम यांच्या आवाजातील काल्पनिक संवाद आजही कोळ्यांची संस्कृती ताजी करतत.

वेसावची पारू या कोळी गीतांच्या पारंपारिक गीतांना प्लॅटिनम डिस्क ने सन्मानित केले होते. कोळीगीतांना इतकी लोकप्रियता लाभणं हे खरोखरच आश्चर्य म्हणावे लागेल. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्यांच्या मुंबई भेटीत "मी हाय कोली.." या गाण्यावर बच्चेकंपनीसह सपत्नीक थिरकले होते. ही आठवण आजही ताजी आहे. अखेर पारू गो पारू वेसावची पारू आणि कोणताही शासकीय पुरस्कार न घेताच अशा अजरामर गीतांना उजाळा देणारे पालक कोळ्यांच्या पारुला पोरके करून गेले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Vastu Tips: सकाळी तुळशीला पाणी घालण्याची योग्य वेळ काय?

Today's Marathi News Live : महाविकास आघाडीची उद्या सेनाभवनमध्ये संविधान वाचवा सभा

Israel-Hamas War: इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Maharashtra Election: महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच कायम; ठाणे मतदारसंघ कुणाच्या पारड्यात, आज घोषणा होणार?

Tamannaah Bhatia Today Inquiry : तमन्ना भाटियाची महाराष्ट्र सायबर सेलकडून होणार चौकशी, जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT