Farzi' Trailer Out Instagram @shahidkapoor
मनोरंजन बातम्या

Farzi Trailer Out: शाहिद कपूर-विजय सेतुपती डिजिटल डेब्यूसाठी सज्ज, 'फर्जी'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

राज आणि डीकेची जोडी आता 'फर्जी' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Pooja Dange

Shahid Kapoor-Vijay Sethupathi Ready For Digital Debut: शाहिद कपूर आणि विजय सेतुपती स्टारर आगामी वेब सीरिज 'फर्जी'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'फॅमिली मॅन' सारख्या जबरदस्त वेबसीरिजनंतर राज आणि डीकेची जोडी आता 'फर्जी' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. Amazon Prime Video ने या मूळ मालिकेचा ट्रेलर आधीच प्रदर्शित केला आहे.

सुपरस्टार शाहिद कपूर आणि मक्कल सेल्वन, विजय सेतुपती या क्राईम ड्रामाद्वारे डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहेत. त्याच्यासोबत या मालिकेत के.के. मेनन, राशी खन्ना, भुवन अरोरा, रेजिना कॅसांड्रा, अमोल पालेकर असे अनेक कलाकार दिसणार आहेत. (Actor)

ट्रेलरची सुरुवात शाहिद कपूरपासून होते. शाहिदला भरपूर पैसे कमवायचे असतात. सनी (शाहिद) हा कलाकार आहे जो कोणत्याही गोष्टीची कॉपी बनवू शकतो. आता त्याने बनावट नोटा तयार करण्याचा विचार केला आहे. सनी हे काम त्याच्या मित्रासोबत करतो, पण प्रत्येक वाईटावर चांगल्याचे सावट असते. तेवढ्यात टास्क फोर्स ऑफिसर (विजय सेतुपती) ची एंट्री होते. या ऑफिसरने सनीला पकडण्याचे ध्येय बनवले आहे.

ट्रेलर लाँचच्या दिवशी या वेबसीरीज बोलताना शाहीद कपूर म्हणाला, “किमान सांगायचे तरी हा माझा डिजिटल डेब्यू आहे, पण राज आणि डीके यांच्यासोबत काम करणे अगदी घरच्यासारखे वाटले. विजय सेतुपती, नानू (अमोलजी) केके मेनन, राशीची अशा उत्कृष्ट कलाकारांसोबत काम करण्यात वेगळी मजा आहे. सनीचे पात्र माझ्यासाठी सोपे नव्हते, कारण हे पात्र खूप गुंतागुंतीचे आहे. ही वेबसीरीज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.

राज आणि डीकेची ही वेबसीरीज १० फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या वेबसीरीजमध्ये एकूण 8 भाग आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT