Shahid Kapoor Get Angry On Paparazzi Saam TV
मनोरंजन बातम्या

Shahid Kapoor On Paparazzi: कशाला ओरडताय? वेड लागलंय का? शाहिदचा पापाराझींसमोर संयम सुटला, चांगलंच सुनावलं, व्हिडीओ व्हायरल

Shahid Kapoor with Wife Meera: शाहिद कपूर त्याचा सावत्र भाऊ रुहान कपूरच्या लग्नाच्या पार्टीला गेला होता.

Pooja Dange

Shahid Kapoor Attended Ruhan Kapoor Wedding Reception:

शाहिद कपूर नेहमीच आपल्याला कूल मूडमध्ये दिसतो. शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर एकत्र असेल तर पापाराझींसमोर पोजही देतात.

शनिवारी शाहिद आणि मीरा एकत्र स्पॉट झाले. दोघांनी पापाराझींना फोटो देखील काढू दिले. मात्र जेव्हा ते बाहेर येत होते तेव्हा पापाराझींवर शाहिद कपूर भडकला. तसेच त्याने त्यांना ओरडाओरडा करून नका असे सुनावले. शाहिदच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाहिद कपूर त्याचा सावत्र भाऊ रुहान कपूरच्या लग्नाच्या पार्टीला गेला होता. मीरा कपूर देखील शाहिद कपूरसोबत होती. दोघे जेव्हा रस्त्याच्या कडेला उभे राहून त्यांच्या गाडीची वाट पाहत होते तेव्हा पापाराझीं फोटोसाठी आरडाओरडा करू लागले. त्यांना असं करताना पाहून शाहिद कपूर त्यांच्यावर संतापला. शाहिद त्यांना म्हणाला, 'इथेच उभे आहोत आम्ही, कशाला ओरडताय? जेव्हा इथून जाऊ तेव्हा आरडाओरडा करा.'

शाहिद कपूर या वेळी त्याची पत्नी मीरा आणि सासूसह होता. पापाराझींनी गोंधळ घातल्यानंतर शाहिदने त्यांना खूप सुनावले. शाहिदच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर च्यारलं होत आहे.

या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी शाहिदच बाजू घेतली आहे. 'शाहिदने जे केलं ते बरोबर होत', 'त्यांना देखील स्पेस देण्याची गरज आहे', 'सगळी त्यांना पाठलाग करतात त्यांना श्वास घेऊ दे' अशा कमेंट नेटकरी करत आहेत. (Celebrity)

शाहिद कपूरच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर, शाहिद त्याच्या आगामी चित्रपटामध्ये क्रिती सेननसह दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून चित्रपटकजे नाव मात्र अद्याप समजलेले नाही. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT