Deva Song Bhasad Macha Google
मनोरंजन बातम्या

Deva Trailer Out: ‘आय एम माफिया…’, पोलीसाच्या भूमिकेत शाहिदचा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार; 'देवा' ट्रेलर रिलीज

Deva Trailer Out: शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये शाहिद धमाकेदार अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. या चित्रपटात शाहिदने पोलिसाची भूमिका साकारली आहे.

Shruti Vilas Kadam

Deva Trailer Out: चाहत्यांच्या प्रचंड मागणीमुळे बॉलीवूडचा कबीर सिंग म्हणजेच शाहिद कपूरच्या बहुप्रतिक्षित अ‍ॅक्शन थ्रिलर 'देवा' चा ट्रेलर वेळेपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला आहे. एका दमदार टीझर आणि गाण्यानंतर प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. झी स्टुडिओज आणि रॉय कपूर फिल्म्स निर्मित, देवा हा चित्रपट एका रोमांचक सिनेमॅटिक प्रवासाची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे.

देव अंब्रेची भूमिका अभिनेता शाहिद कपूर या चित्रपटात साकारणार आहे. या चित्रपटातील त्याचे अ‍ॅक्शन आणि स्टंट चाहत्यांच्या आवडत आहे. शाहिदसोबत या चित्रपटात पूजा हेगडे देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसतेय, देवा शहरातून गुंडांना संपवताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये गुंड आणि देवा यांच्यातील जोरदार लढाई दाखवण्यात आली आहे, या ट्रेलरमधला त्याचा 'मी एक माफिया आहे...' हा डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'भासद मचा' गाण्यावरील नृत्यासह ट्रेलर प्रदर्शित

ट्रेलर लाँच कार्यक्रमात चित्रपटातील 'भासद मचा' या गाण्यावर शाहिदने डान्स करून चाहत्यांना खुश केले. या कार्यक्रमाला शाहिद कपूर आणि पूजा हेगडे उपस्थित होते. निर्मात्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट स्टोरीवर ट्रेलर लाँच इव्हेंटचा व्हिडिओ शेअर केला.

'देवा' रिलीज डेट

प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक रोशन अँड्र्यूज दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज आणि रॉय कपूर फिल्म्स निर्मित, 'देवा' हा एक धमाकेदार अॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे. हा चित्रपट ३१ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dusky Skin Makeup Tips: सावळ्या रंगाच्या त्वचेवर अशा पद्धतीने करा मेकअप; चेहऱ्यावर दिसेल नॅचरल ग्लो

Ladki Bahin : "आम्हालाच मत द्या, नाहीतर 'लाडकी बहीण'चे ₹१५०० बंद करू, भाजप नेत्यांकडून ब्लॅकमेल"

Maharashtra Live News Update: अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ

Kitchen Hacks: कांद्यावर काळे डाग येऊ नये म्हणून करा हे सोपे उपाय

Famous Actress : मुलीसाठी बापाने हद्द पार केली; लोकप्रिय अभिनेत्रीचं केलं अपहरण, धमकी दिली अन्..., वाचा नेमकं प्रकरण

SCROLL FOR NEXT