Kriti Sanon And Shahid Kapoor Upcoming Movie Poster Instagram @kritisanon
मनोरंजन बातम्या

Shahid-Kriti Film First look: शाहिद कपूर-क्रिती सेनन पहिल्यांदाच दिसले एकत्र; दोघांचे रोमँटिक पोस्टर व्हायरल

Shahid Kapoor and Kriti Sanon's film: क्रिती सेननने इन्स्टाग्रामवर तिच्या आणि शाहिदच्या चित्रपटाचे रोमँटिक पोस्टर शेअर केले.

Pooja Dange

Shahid Kapoor and Kriti Sanon film first look Out: शाहिद कपूर आणि क्रिती सेनन पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. त्यांच्या या आगामी चित्रपटाचे नाव अद्याप समजलेले नाही. शनिवारी क्रिती सेननने इन्स्टाग्रामवर तिच्या आणि शाहिदच्या चित्रपटाचे रोमँटिक पोस्टर शेअर केले. यासोबतच तिने लेटेस्ट अपडेट्सही चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.

अमित जोशी आणि आराधना साह लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिनेश विजन, ज्योती देशपांडे आणि लक्ष्मण उतेकर यांनी याची निर्मिती केली आहे. यात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि डिंपल कपाडिया देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

चित्रपटाच्या शूटिंग संपल्याचे सांगत क्रितीने लिहिले, "आमच्या अशक्यप्राय प्रेमकथेच्या समाप्तीची घोषणा करत आहे. आमचा शीर्षक नसलेला हा प्रोजेक्ट ऑक्टोबर 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओ आणि दिनेश विजन याचे सदारकर्ते आहेत.

फर्स्ट लूक पोस्टरमध्ये क्रिती आणि शाहिद दोघेही समोरासमोर बाईकवर बसलेले आहेत. तसेच या पोस्टरमध्ये सूर्यास्ताची वेळ दाखविण्यात आली आहे. क्रिती सीटवर दिसली तर शाहिद टाकीवर बसला आहे. पोस्टरवर 'एक असंभव प्रेमकथा' असंही लिहिलं होतं.

या पोस्टरमध्ये शाहिद आणि क्रिती रोमँटिक पोज देत आहेत. पहिल्याच पोस्टरमधील या रोमॅन्सने प्रेक्षकांची चित्रपटविषयीची उत्सुकता वाढवली आहे. पोस्टर पाहून नेटकरी विविध अंदाज बांधत आहेत. या पोस्टरमध्ये शाहिद आणि क्रिती यांची जी अदलाबदली दाखविण्यात आलाय आहे त्यावरून चित्रपटामध्ये प्रेमाचे वेगळे पैलू पाहायला मिळणार का? असा प्रश्न पडला आहे.

या पोस्टरमध्ये कितीत बाईकच्या सीटवर बसली आहे तर शाहिद बाईकच्या टाकीवर. सामान्यतः हे चित्र उलट असल्याचं नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा चित्रपट वूमन सेंट्रिक असेक का? अशी चर्चा नेटकरी करत आहेत.

शाहिद दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या आगामी अॅक्शन चित्रपट ब्लडी डॅडीमध्ये दिसणार आहे. चित्रपटाच्या अधिकृत प्रदर्शनाची तारीख अद्याप प्रलंबित आहे. शाहिद अलिकडेच थ्रिलर वेबसीरीज फर्जीमध्ये विजय सेतुपतीसोबत दिसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT