Aryan Khan yandex
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: लेकीनंतर, शाहरुख खानचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, पहिल्या वेब सीरिजची घोषणा

Aryan Khan: गेल्या वर्षी शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने 'द आर्चीज' या ओटीटी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता त्याचा मुलगा आर्यन खानही फिल्मी दुनियेत येण्यासाठी सज्ज झाला असून त्याच्या पहिल्या वेब सीरिजची ही घोषणा झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Latest Bollywood News: फिल्मी दुनियेतील स्टार किड्सचे पदार्पण नेहमीच खास राहिले आहे. आता सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे नाव सामील झाले आहे. या संदर्भात त्यांची मुलगी सुहाना खान नंतर आता त्याचा मुलगा आर्यन ही नशीब आजमावण्यासाठी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे, याची घोषणा नेटफ्लिक्सने १९ नोव्हेंबर रोजी केली आहे. आर्यन खान त्याच्या वेब सीरिज डेब्यू सीरिजमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. विशेष म्हणजे आर्यन अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणून मनोरंजन विश्वात प्रवेश करणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की आर्यन खान त्याच्या होम प्रोडक्शन रेड चिलीज एंटरटेनमेंट बॅनरखाली वेब सीरिजच्या तयारीत व्यस्त आहे. या मालिकेतून आर्यन दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आता या प्रकरणाबाबत नेटफ्लिक्स इंडियाने पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये आर्यनच्या मालिकेबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.  नेटफ्लिक्सने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

"नेटफ्लिक्सने रेड चिलीज एंटरटेनमेंटशी हातमिळवणी केली आहे आणि आम्ही दोघे लवकरच एक वेब सीरिज घेऊन येत आहोत, जी गौरी खान निर्मित आणि आर्यन खान दिग्दर्शित करणार आहे."

या घोषणेनंतर शाहरुख खानच्या चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. शाहरुखची झलक त्याच्या मुलाच्या पहिल्या वेब सीरिजमध्येही पाहायला मिळेल, अशी सर्वांना आशा आहे. मात्र, त्याची रिलीज डेट आणि स्टार कास्ट याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही मालिका पुढील वर्षी २०२५ मध्ये येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

आर्यन खानच्या या वेब सीरिजचे नाव स्टारडम मानले जात आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची आहे. ९० च्या दशकातील सुपरस्टार बॉबी देओल आर्यनच्या डेब्यू मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. निर्माता करण जोहरच्या चॅट शो कॉफी विथ करणच्या सीझन ८ मध्ये, बॉबीने खुलासा केला होता की तो रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनत असलेल्या मालिकेत काम करत आहे, ज्याचा दिग्दर्शक दुसरा कोणीही नाही तर हा आर्यन खान आहे. 

Edited by-Archana Chavan

कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट; जंगलात आढळले दोघांचे मृतदेह, परिसरात खळबळ

Collar Blouse Designs : स्टाइल में रहने का...; कॉलर ब्लाउजच्या 5 सुंदर पॅटर्न्स, साडीला येईल मॉडर्न लूक

Maharashtra Live News Update : दिवाळीला आपल्या घरची लक्ष्मी कमळावर होती, त्यामुळे जालन्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा ही कमळावर येणार आहे- चंदशेखर बावनकुळे

अजित पवारांच्या 6 बैठकांना दांडी; शहांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे अन् CM फडणवीस एकाच व्यासपीठावर, चर्चांना उधाण

Contrast Colour Matching saree: कोणत्या रंगावर कोणता रंग सर्वात जास्त उठून दिसेल? सध्या 'या' 5 रंगांच्या जोड्या आहेत ट्रेडिंगमध्ये

SCROLL FOR NEXT