Dunki On Netflix  ANI
मनोरंजन बातम्या

Dunki: शाहरुख खानच्या'डंकी'चा नेटफ्लिक्सवर डंका; मोडला स्वता:चाच रेकॉर्ड

Dunki On Netflix : हा चित्रपट २१ देशांमध्ये टॉप १० मध्ये ट्रेंड करत आहे. २०२३ मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या डंकी या चित्रपटाने नेटफ्लिक्सवरील सर्व रेकॉर्ड मोडलेत. या चित्रपटाने भारतातच नव्हे तर जगभरात जबरदस्त कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ४५० कोटींची कमाई केलीय.

Bharat Jadhav

Dunki Become Number 1 On Netflix:

नेटफ्लिक्सवर डंकीने डंका वाजवलाय. डिंकी सर्वाधिक पाहिलेला चित्रपट ठरलाय. या चित्रपटाने सालार आणि जवान या दोघांचेही रेकॉर्ड तोडले आहेत. हा चित्रपट २१ देशांमध्ये टॉप १० मध्ये ट्रेंड करत आहे. २०२३ मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या डंकी या चित्रपटाने नेटफ्लिक्सवरील सर्व रेकॉर्ड मोडलेत.(Latest News)

या चित्रपटाने भारतातच नव्हे तर जगभरात जबरदस्त कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ४५० कोटींची कमाई केलीय. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटाने शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाला मागे टाकले आहे. जवानला नेटफ्लिक्सवर ११ दिवसांत ८.९ दशलक्ष दर्शकांनी पाहिला आहे. तर 'डंकी' हा चित्रपट अवघ्या ४ दिवसांत ९.१ दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. डंकी या चित्रपटाने प्रभासच्या 'सालार' या चित्रपटालाही रेकॉर्ड बनवण्याच्या बाबतीत मागे टाकले आहे. डिंकीने अवघ्या ४ दिवसांत सालारच्या OTT व्यूअरशिप टॅग हिसकावून घेतलाय.

यासह नेटफ्लिक्सवर हा तिसरा सर्वाधिक पाहिलेला नॉन-इंग्रजी चित्रपट ठरलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाला नेटफ्लिक्सवर आतापर्यंत २४.१ मिलियन वॉच टाइम मिळालाय. म्हणजेच आतापर्यंत २ कोटी ४१ लाख तास पाहिला गेलाय. हा चित्रपट २१ देशांमध्ये टॉप १० मध्ये ट्रेंड करत आहे. हा चित्रपट भारत, UAE, श्रीलंका, बहरीन, बांगलादेश, ओमान, मालदीव आणि पाकिस्तानमध्ये टॉपवर आहे.

या चित्रपटात (Movie) शाहरुख खानने एका पंजाबी माणसाची भूमिका साकारलीय. त्याला कॅनडाला जायचे असते. मात्र त्याच्याकडे योग्य कागदपत्रे नसतात. अशा स्थितीत तो डंकी मार्गाचा अवलंब करत कॅनडाला जातो. डंकीचा अर्थ म्हणजे दुसऱ्या देशात चुकीच्या मार्गाने जाणे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT