Thalapathy Vijay In Jawan  
मनोरंजन बातम्या

Thalapathy Vijay In Jawan: 'जवान'मध्ये साऊथ सुपरस्टारची एन्ट्री; थलापती विजयचा रोल रिव्हील

Thalapathy Vijay Cameo In Jawan: विजय थलपथीचा कॅमिओ जवानमध्ये पाहायला मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Thalapathy Vijay Role In Jawan Reveal:

तमिळ चित्रपट दिग्दर्शक अॅटली 'जवान' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे बॉलिवूडचा शाहरुख खान. जवान हा मल्टीस्टारर चित्रपट आहे.

साऊथची लेडी सुपरस्टार नयनताराही या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपटाचा प्रिव्ह्यू रिलीज झाला असून काही गाणीही समोर आली आहेत. शाहरुखचा भन्नाट लूक आणि चित्रपटाच्या स्टार कास्ट याबद्दल तुफान चर्चा आहे. आता या चित्रपटात आणखी एक मोठा धमाका पाहायला मिळणार आहे. साऊथचा सुपरस्टार विजय थलापथी हा देखील जवानाचा भाग असणार आहे.

जवानचा नवा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे. आधीच प्रिव्ह्यू आणि गाण्यांनी चाहत्यांची चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवली आहे. मात्र निर्मात्यांनी कथेविषयीचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. जवानाचे अॅडवान्स तिकीट बुकिंगही सुरू झाले आहे. दरम्यान, रिलीजच्या 11 दिवस आधी, निर्मात्यांनी चित्रपटातील साऊथ सुपरस्टार विजय थलपथीची भूमिका रिव्हील केली आहे.

दिग्दर्शक अॅटली थलपथी विजयचे खूप मोठे फॅन आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे अॅटली जवान चित्रपटात विजयला लीड म्हणून घेणार असल्याची चर्चा होती. मात्र, दिग्दर्शक शाहरुख खानसोबत थलपथीचा कॅमिओ करणार आहे.

या वृत्ताला आता दुजोरा मिळाला आहे. चाहत्यांना विजय थलपथीचा कॅमिओ जवानमध्ये पाहायला मिळणार आहे.या चित्रपटात अभिनेत्याची ग्रँड एन्ट्री होणार आहे. थलपथी विजयचे चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यासोबतच अभिनेता त्याची सिग्नेचर पोजही करताना दिसणार आहे. विजयची एक झलक त्याच्या चाहत्यांना थिरकायला लावले.

शाहरुख खान आणि थलपती विजय यांसारखे दाक्षिणात्य आणि बॉलीवूडचे दोन्ही मेगास्टार मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले तर चाहत्यांची क्रेझही एका वेगळ्या लेवलवर गेलेली असेल.

चित्रपट पुढील महिन्यात 7 सप्टेंबर 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT