Shah Rukh Khan Pushes Old Man Video Viral Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan Trolled : फोटोसाठी शाहरुख खानने म्हाताऱ्या माणसाला ढकललं, VIDEO व्हायरल होताच नेटकरी संतापले

Shah Rukh Khan Pushes Old Man : कायमच किंग खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो. सध्या किंग खान एका व्हायरल व्हिडिओमुळे ट्रोल होत आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने आपल्या खास शैलीच्या जोरावर जगभरात विशेष ओळख मिळवली आहे. खरंतर त्याचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. त्याच्या अभिनयाची क्रेझ चाहत्यांमध्ये फार मोठी आहे. कायमच किंग खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो. सध्या किंग खान एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. एका व्हायरल व्हिडिओमुळे अभिनेता ट्रोल होत आहे.

नुकताच शाहरुख खानला ७७ व्या “लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल”मध्ये “जीवनगौरव पुरस्कार”ने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या पुरस्काराने सन्मानित होणारा हा पहिलाच बॉलिवूडमधील भारतीय अभिनेता आहे. या कारणामुळे जरीही किंग खानवर कौतुकाचा वर्षाव होत असला तरीही तो एका कारणामुळे तुफान ट्रोल झाला आहे. सध्या सोशल मीडियावर या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर त्याने एका व्यक्तीला ढकलल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत अभिनेता रेड कार्पेटवर फोटो पोजेससाठी आला. तर त्यावेळी अचानक बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीला त्याने ढकललं. त्याची कोणतीही चूक नसताना अभिनेत्याने ढकलल्यामुळे तो ट्रोल होत आहे. ट्रोलर्सकडून शाहरुखवर टीका केली जात आहे. "शाहरूख खान तू वयापेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तीला धक्का दिला. तुला लाज वाटायला हवी", "मला माहित आहे, तो चांगला व्यक्ती नाही. शाहरूख फक्त देखावा खूप छान करतो."

"ही रिॲलिटी आहे. मला नाही लोकं शाहरूखवर डोळे बंद करून का विश्वास ठेवतात.", " मी शाहरूखची खूप मोठी फॅन आहे. अशा पद्धतीने वडीलधारी व्यक्तीसोबत वागलेला पाहून मी खूप निराश झाली आहे. मी आतापर्यंत नाण्याची एकच बाजू पाहिली होती. आता दुसरीही बाजू पाहिलीये." अशा शब्दात शाहरूखला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

SCROLL FOR NEXT