शाहरुख खानच्या नावाची 56 मजली इमारत बांधली जात आहे.
शाहरुख खानच्या नावाचा टॉवर दुबईत बांधला जाणार आहे.
शाहरुख खानची क्रेझ जगभरात पाहायला मिळते.
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या आपला आगामी चित्रपट 'किंग'मुळे (king) चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूक टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाहरुखची जगभरात क्रेझ पाहायला मिळते. अशात शाहरुख खानच्या नावाचा भव्य टॉवर बांधला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शाहरुखच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.
मुंबईत शुक्रवारी एका रिअल इस्टेट कार्यक्रमात शाहरुख खान सहभागी झाला. त्या कार्यक्रमात शाहरुख खानने त्यांच्या नावाची इमारतीचे उद्घाटन केले. ज्याचे नाव 'शाहरुख होम डेन्यूब' (Shahrukhz by Danube) असे आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत. या सोहळ्याला इमारतीचे संस्थापक आणि चेअरमन रिझवान साजन उपस्थित होते.
शाहरुख खानच्या नावाची इमारत दुबईत (Dubai) बांधत आहे. ही इमारत 56 मजली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ज्याची किंमत तब्बल 4000 कोटींपेक्षा जास्त आहे. 'शाहरुख होम डेन्यूब' हा एक व्यावसायिक टॉवर आहे. टॉवरचे 2029 पर्यंत बांधून पूर्ण होईल. येथे शाहरुख खानची मूर्ती उभारण्यात आली आहे. टॉवरमध्ये एक हेलिपॅड आणि स्विमिंग पूल असेल.
शाहरुख खान आनंद व्यक्त करत म्हणाला, " आज माझी आई जिवंत असती, तर तिला खूप आनंदी झाला असता. हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. जेव्हा माझी मुलं दुबईला येतील तेव्हा मी त्यांना सांगेन की, तुमच्या वडिलांचे नाव बिल्डींगवर लिहिलेले आहे." कार्यक्रमात शाहरुख खानने भन्नाट डान्स देखील केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.