King Khan Mobbed By Fans At Srinagar Airport: बॉलिवूडचा किंग खान या वर्षात कमालीचा चर्चेत आहे, शाहरूखचा ‘पठान’ चित्रपट बॉक्स ऑफिससह ओटीटीवर देखील चांगलाच धुमाकूळ घालत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘जवान’ चित्रपटाची शूटिंग संपली असून आता तो त्याच्या ‘डंकी’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी रवाना झाला आहे.
शाहरुख त्याच्या आगामी ‘डंकी’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी टीमसोबत काश्मिरला जातानाचे फोटो गेल्या काही दिवसांपुर्वी सोशल मीडिया व्हायरल झाले होते. नुकताच श्रीनगर विमानतळावर शाहरूख पोहोचताच त्याच्या चाहत्यांनी त्याला घेरले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. यावेळी त्याला कडेकोट सुरक्षा देत त्याला बाहेर काढण्यात आले. (Bollywood Film)
शाहरुख खान अलीकडेच तापसी पन्नू सोबत त्याच्या 'डंकी' या आगामी चित्रपटासाठी काश्मीरमध्ये शूटिंग सुरू होती. शूटिंगवरून परत येत असताना विमानतळावर चाहत्यांनी त्याला घेरल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. शाहरूखची सिक्योरिटी त्याला त्या गर्दीपासून वाचवत असताना, अनेक लोक मोबाईलमध्ये आपल्या आवडत्या सेलिब्रिटीचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी एकच धडपड करत होते. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी सुरक्षा रक्षक कुठे आहेत असा सवाल विचारला आहे. (Bollywood News)
शुक्रवार, 28 एप्रिलच्या संध्याकाळी, शाहरुख काश्मीरचे शूट आटोपल्यानंतर मुंबईतील विमानतळावर दिसला. श्रीनगर विमानतळावरील व्हिडिओमध्ये तो त्याच गेटअपमध्ये होता. त्याच्या अंगावर काळी पँट, पांढरा टी-शर्ट आणि काळ्या रंगाचे लेदर जॅकेट होते. यावेळी त्याने गेटच्या बाहेर त्याची वाट पाहत असलेल्या पापाराझींना पोझही दिली नाही. तो फक्त आला, बसला आणि निघून गेला. (Entertainment News)
'डंकी'च्या सेटवरून अभिनेत्याचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते. तो आणि त्याची टीम काश्मीरमधील सोनमर्गमध्ये दिसली. काही फोटोंमध्ये अभिनेत्याने चाहत्यांसोबत पोजही दिल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.