Shah Rukh Khan Upcoming Jawan Look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan Viral Look: चेहऱ्यावर पट्टी आणि विस्कटलेले केस, किंग खानला झालंय तरी काय? शाहरुखचा लूक होतोय व्हायरल

'जवान' चित्रपटातील शाहरुख खानच्या लूकचा फोटो सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Jawan Viral Look: बॉलिवूडचा बादशाह किंग खानने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक केले आहे. सध्या त्याच्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळालेल्या यशाचा सध्या आनंद लुटत आहे. या चित्रपटाला देशासह-विदेशात प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून 'पठान'हा सध्या सर्वत्र दमदार कमाई करत आहे. या सर्वांमध्ये शाहरुख खान स्टारर त्याच्या आगामी चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर येत आहे.

२०२३ या वर्षात शाहरुखचे तब्बल तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे 'जवान'. शाहरुख खान स्टारर त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. खरं तर, 'जवान' चित्रपटातील शाहरुख खानच्या लूकचा फोटो सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. 'जवान'च्या पहिल्या टीझरमध्ये शाहरुखच्या चेहऱ्यावर बऱ्याच बांधलेल्या पट्ट्या दिसत आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनल पोस्टरमध्येही शाहरुखचा हाच लूक वापरण्यात आला होता. आता सोशल मीडियावर आगामी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही खास फोटो लिक झाले आहे. यात शाहरुख खानचे लांब केस असून चेहऱ्यावर पट्टी बांधल्यामुळे त्याचा पुर्ण चेहरा दिसत नाही. या फोटोनंतर चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता वाढली असून किंग खानचा नवा लूकही चाहत्यांच्या पसंदीस पडला आहे. चित्रीकरणा दरम्यान लीक झालेला फोटो मुंबईतीलच आहे. त्यामुळे या चित्रपटाचा टीझर लवकरात लवकर प्रदर्शित होईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.

शाहरुखच्या चित्रपटातील लीक झालेले फोटो चाहत्यांनी पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांना 'पठान'पेक्षा हा आगामी 'जवान' चित्रपट बरीच कमाई करेल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT