Shah Rukh Khan Invest 200 Crore In Movie King Instagram
मनोरंजन बातम्या

Suhana Khan King Film: सुहाना खानच्या ‘किंग’साठी शाहरूख खानने गुंतवले २०० कोटी, करणार बॉलिवूडमध्ये ग्रँड डेब्यू

Suhana Khan And Shah Rukh Khan Film: सुजॉय घोष दिग्दर्शित ‘किंग’ चित्रपटासाठी शाहरूखने जवळपास २०० कोटींची गुंतवणूक केल्याचे बोलले जात आहे. सुहानाच्या डेब्यू चित्रपटासाठी किंग खान कोणतीही कसर सोडू इच्छित नाही.

Chetan Bodke

Shah Rukh Khan Invest 200 Crore In Movie King

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानची लेक सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तिचा गेल्या वर्षी ‘द आर्चीज’ हा चित्रपट रिलीज झालेला होता. या चित्रपटातून तिने ओटीटी विश्वात डेब्यू केलं होतं. आता लवकरच सुहाना खान ‘किंग’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार डेब्यू करणार आहे. अशातच तिच्या चित्रपटाबद्दल महत्वाची अपडेट समोर आली आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित ‘किंग’ चित्रपटासाठी शाहरूखने जवळपास २०० कोटींची गुंतवणूक केल्याचे बोलले जात आहे. सुहानाच्या डेब्यू चित्रपटासाठी किंग खान कोणतीही कसर सोडू इच्छित नाही.

गेल्या वर्षी रिलीज झालेल्या झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ चित्रपटातून सुहानाने फिल्म इंडस्ट्रिमध्ये डेब्यू केले होते. पण तिच्या त्या चित्रपटाची चाहत्यांमध्ये इतकी काही खास झलक पाहायला मिळाली नाही. या चित्रपटातून अनेक स्टारकिड्सनेही डेब्यू केलेले होते. सुहानाने आता ओटीटीवर डेब्यू केल्यानंतर सुहाना 'किंग'मधून रुपेरी पडद्यावर डेब्यू करणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'किंग' चित्रपट प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे. 'किंग'ची निर्मिती 'रेड चिलीज एंटरटेनमेंट'च्या बॅनरखाली होत आहे. त्यामुळेच शाहरुखला हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर बनवायचा आहे. अखेर, त्याची मुलगी 'किंग' चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाची निर्मिती २०० कोटींच्या बिग बजेटमध्ये होणार आहे. या चित्रपटासाठी शाहरूखने जवळपास २०० कोटींची गुंतवणूक केल्याचे बोलले जात आहे. जवळपास वर्षभरापासून या चित्रपटावर काम सुरू आहे. निर्मात्यांकडून काही दिवसांपासून चित्ररपटाच्या कथेवर आणि ॲक्शनवर विशेष लक्ष देत आहेत.

या चित्रपटातून सुहाना ग्रँड डेब्यू करणार, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. चित्रपटाचे कथानक रॉ एजंटवर आधारित आहे. हा चित्रपट सुहानाप्रमाणे शाहरुख खानसाठी ही खास चित्रपट आहे. २०२४ मध्ये शाहरूखचा कोणताही चित्रपट रिलीज होणार नाही. सध्या शाहरूख 'किंग' चित्रपटाच्या कामामध्ये व्यग्र असल्याचे बोलले जात आहे. 'किंग' हा एक ॲक्शन चित्रपट असणार आहे, त्यामुळे त्याच्या ॲक्शन सीन्सवर विशेष लक्ष दिले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटासाठी सिद्धार्थ आनंद काही हॉलिवूड स्टंट डायरेक्टर्सशी बोलणी करत आहेत. या चित्रपटात डायरेक्टर्स व्हीएफएक्सचाही वापर करणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

SCROLL FOR NEXT