Pathaan Movie SRK Look  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan : ...म्हणून शाहरूखची जबरा फॅन्सना स्पेशल ट्रीट; 'पठान'चा टफ लूक शेअर

शाहरुखला चित्रपटसृष्टीमध्ये ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं त्याने त्याच्या चाहत्यांना मोठी ट्रीट दिली आहे. त्याने त्याच्या 'पठान' या आगामी चित्रपटातील त्याच्या लूकचा टीजर शेअर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरूखला चित्रपटसृष्टीमध्ये ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं त्याने त्याच्या चाहत्यांना मोठी ट्रीट दिली आहे. त्याने त्याच्या 'पठान'(Pathaan) या आगामी चित्रपटातील त्याच्या लूकचा टीजर शेअर केला आहे. यामध्ये शाहरुखने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स घातली आहे. तो एका हातात बंदूक घेऊन उभा असलेला दिसत आहे. त्याचे लांब केसही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्याच्या चेहऱ्यावर जखमा दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना त्याने इंडस्ट्रीत ३० वर्षे पूर्ण झाल्याचे सांगितले. चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना लवकरच भेटू असे सांगितले आहे.

शाहरुख खानने(shahrukh khan) शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याने त्याचा पूर्ण चेहरा दाखवला आहे. याआधी रिलीज झालेल्या पोस्टर्स आणि टीझरमध्ये त्याचा पूर्ण लूक दाखवला नव्हता. शाहरुखचा हा रफ अँड टफ लूक खूपच आकर्षक दिसत आहे. शाहरुखला चित्रपटसृष्टीमध्ये ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या मोठ्या ट्रीटपेक्षा कमी नाही.

हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करताना शाहरुख खानने लिहिले की, '३० वर्षे पूर्ण. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद. हा प्रवास असाच पुढे ठेवण्यासाठी घेऊन येत आहे #पठान. यशराज फिल्म्सची ५० वर्षे साजरी करूयात #पठानसोबत २५ जानेवारी २०२३ ला सर्वत्र प्रदर्शित.

शाहरुख खानने जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोणलाही या व्हिडिओमध्ये टॅग केले आहे. सिद्धार्थ आनंदने 'पठान' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, या चित्रपटात जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच या चित्रपटात सलमान खानचा एक खास कॅमिओदेखील असणार आहे. तसेच शाहरुख खान सलमान खानच्या 'टायगर ३'मध्ये दिसणार आहे.

शाहरुख खान तब्बल ५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. २०२३ मध्ये तो 'पठान', 'डंकी' आणि 'जवान' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. २०२३ मध्ये त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT