Actor Shah Rukh Khan launches Gauri Khan's coffee table book Instagram @gaurikhan_style
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan On Gauri Khan's Age: अरेरे! चक्क बायकोचं वय विसरला.. भर कार्यक्रमात शाहरुखला गौरीने टोकलं

Gauri Khan's Book Launch Event: शाहरुख खान खानने त्याची पत्नी आणि इंटिरियर डिझायनर गौरी खानचे वय विसरला.

Pooja Dange

Shah Rukh Khan Gets Confused About Gauri Khan's Age: शाहरुख खान आणि गौरी खान बॉलिवूडचे पॉवर कपल आहे. गौरी खान प्रत्येक कठीण प्रसंगी शारुखच्या पाठीशी ठामपणे उभी होती. जीवनातील प्रत्येक चढ-उतारावर त्यांनी एकमेकांची साथ दिली आहे. शाहरुखने १५ मे रोजी गौरीचे कॉफी टेबल बुक लाँच केले. दरम्यान शाहरुखने त्यांच्या जीवनाशी संबंधित काही खुलासे केले आहेत.

दरम्यान गौरीच्या माय लाइफ इन डिझाईनच्या लाँचच्या वेळी शाहरुख खान उपस्थित होता. तिचे हे बूक कॉफी टेबल बुक आहे. यावेळी बोलताना शाहरुख खान खानने त्याची पत्नी आणि इंटिरियर डिझायनर गौरी खानचे वय विसरला.

शाहरुख पुस्तकाविषयी सांगताना म्हणाला, "या पुस्तकात असे नमूद करण्यात आले आहे की गौरीने वयाच्या चाळीशीत तिचं स्वप्न साध्य केलंय. गौरीने केलंय त्याप्रमाणे कोणीही वयाच्या चाळीशीत स्वप्न साध्य करू शकते." शाहरुख बोलत असतानाच गौरीने त्याला दुरुस्त केले आणि शाहरुखला सांगितले, "ती आता 37 वर्षांची आहे." हे ऐकताच शाहरुख थोडा थांबला आणि उपस्थित प्रेक्षक खळखळून हसू लागले. (Latest Entertainment News)

यावेळी शाहरुखने दिलेली रिअक्शन फार कमाल होती. तसेच शाहरुख पुढे म्हाला की आमच्या कुटुंबात आम्ही सगळे वयाने कमी होतात. हे सगळं खूप गंमतीशीर होत आणि शाहरुखचा अंदाज देखील सर्वांना खूप आवडला.

तसेच शाहरुखने गौरीच्या क्रिएटिव्हिटी बद्दलही सांगितले, गौरी पॅशनेट आहे. तसेच ती क्रिएटिव्हिट देखील आहे. शाहरुख म्हणाला की त्याचे संपूर्ण कुटुंब क्रिएटिव्ह आहे, अगदी त्याचा 10 वर्षांचा मुलगा देखील. अशाप्रकारे शाहरुखच्या उत्स्फूर्त आणि मिश्किल भाषणाने सर्वांची मनं जिंकली. गौरी आणि शाहरुखचा खास अंदाज यावेळी दिसून आला.

'सुरुवातीला आम्ही मुंबईत स्थायिक होण्यासाठी धडपडत होतो. मग, माझ्या प्रोफेशनमुळे, सामान्य जीवन आणि मुलांचे संगोपन या दरम्यान गौरीचे काही पॅशन असेल हे लक्षात आले नाही. पण हे पुस्तक त्या सर्वांसाठी आहे असे मला वाटते. हे अशा लोकांसाठी आहे ज्यांच्या आयुष्यात काही गोष्टी राहून जातात किंवा हाताबाहेर जातात.

गौरी खानचे नवीन पुस्तक माय लाइफ इन डिझाईनचे 15 मे रोजी मुंबईत प्रकाशित झाले. पेंग्विन रँडम हाऊसने प्रकाशित केलेल्या तिच्या कॉफी टेबल बूकमध्ये तिने तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या खास फोटोंसह एक डिझायनर म्हणून तिचा प्रवास रेखाटला आहे.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला शाहरूखसह त्यांची तिन्ही मुले आर्यन, गौरी आणि अब्राहम देखील उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार? अधिकृत तारीख आली समोर

State Marathi Film Awards2025: मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा दणक्यात साजरा; कोणकोणत्या नामवंतांचा झाला गौरव? वाचा यादी

Nanded Crime:शिवसेना पदाधिकाऱ्याचा कारमाना;'स्पा सेंटर'च्या नावाखाली चालवायचा कुंटणखाना

Uttarakhand News : उत्तराखंडमध्ये ढगफुटी; नांदेडचे दहा पर्यटक अडकले, VIDEO

Mahadevi Elephant:'महादेवी'साठी मुख्यमंत्र्यांचा बैठकीत मोठा निर्णय; हत्तीणीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर

SCROLL FOR NEXT