SRK Greets Cheering Fans Outside Mannat: शाहरुख खानचा फॅन फॉलोविंग नेहमीच चर्चेचा विषय आहे. त्याच्या ‘मन्नत’ बंगल्याच्या बाहेर रोज देशातून हजारो चाहते त्याची खास सिग्नेचर स्टेप पाहण्यासाठी येतात. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला लांबून तरी का होईना पाहता यावं आणि त्याची ती स्टेप आपण करावी असं अनेकांना नेहमीच वाटतं. शाहरूखने यावर्षी ‘पठान’च्या माध्यमातून तब्बल चार वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर तो रूपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटाच्या वेळी अनेकदा शाहरूख खान त्याच्या बाल्कनीतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होता.
काल असाच काहीसा किस्सा मन्नत बंगल्याच्या बाहेर दिसून आला. शाहरुखने आपल्या उपस्थितीत चाहत्यांना आनंदित करत त्यांना अभिवादन करण्यासाठी तो बाहेर आला होता. चाहत्यांना भेटायला आल्यावर शाहरुख नेहमीच त्याची आयकॉनिक पोझ देखील देतो. तशीच आयकॉनिक पोझ त्याने कालदेखील चाहत्यांना दिली. गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आलेलो आयकॉनिक पोझ त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतूर असतात. पण यावेळी मन्नतच्या बाहेर एक मोठा विश्वविक्रमच घडला, तो पाहून शाहरूखही भारवला. शाहरुखच्या चाहत्यांनी मिळून आपल्या लाडक्या सेलिब्रिटीसाठी एक विश्वविक्रम केला आहे.
काल संध्याकाळी शाहरूखच्या ‘मन्नत’ बंगल्यासमोर त्याच्या ३०० चाहत्यांनी शाहरूखची सिग्नेचर स्टेप करताना दिसले. सोबतच शाहरूखनेही आपल्या चाहत्यांसोबत बाल्कनीतून तशीच पोझ दिली. जागतिक स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानच्या चाहत्यांनी अशी पोझ देत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देखील केला आहे.
शाहरुखने खास त्याच्या चाहत्यांना फ्लाइंग किस देत, त्याची आयकॉनिक पोझ देत होता. यावेळी शाहरूखने चाहत्यांसोबत त्याचा सर्वाधिक ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट ‘पठान’ मधील ‘झूमे जो पठान’ गाण्याची हुक स्टेप केली. यावेळी चाहत्यांनी दिलेले प्रेम पाहून आणि आता पर्यंत दिलेला प्रतिसाद पाहून शाहरूख भावूक झाला. यावेळी शाहरूखनेही हात जोडून चाहत्यांचे आभार मानले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.