Shah Rukh Khan On Eid 2023 Instagram
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan Eid 2023: बंगल्याबाहेर उभे होते फॅन अन्.. किंग खानने दिल्या चाहत्यांना खास अंदाजात शुभेच्छा

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Chetan Bodke

Shah Rukh Khan On Eid 2023: आज देशभरासह जगभरात ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने देखील आपल्या चाहत्यांना त्याच्या खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. ईद (EID 2023) च्या खास प्रसंगी शाहरुख खानने मन्नतच्या घराबाहेर उपस्थित हजारो चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. नुकताच शाहरूखचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात व्हायरल होत आहे.

'पठान' चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर शाहरुख खान नक्कीच ईदच्या मुहूर्तावर भेट द्यायला येईल या आशेवर शनिवारी चाहते त्याच्या घराबाहेर जमले होते. अशा परिस्थितीत आता शाहरुख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाहरुख त्याच्या घराबाहेर उपस्थित असलेल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध छायाचित्रकार मानव मंगलानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून शेअर केला आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत, ईदच्या निमित्ताने शाहरुखच्या घराबाहेर हजारो चाहते उपस्थित आहेत. ईदच्या दिवशी शाहरूखची एक झलक पाहण्यासाठी चाहते मन्नतच्या बाहेर कडक उन्हात जमले आहेत. मात्र शाहरुख खाननेही आपल्या चाहत्यांची निराशा केली नसून त्याने घराबाहेर येत चाहत्यांना ईदचे खास गिफ्ट दिले. (Entertainment News)

'पठान' सिनेमाला मिळालेल्या भरघोस यशानंतर आता सर्वांनाच शाहरुखच्या आगामी 'जवान' सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. किंग खानचा 'जवान' हा सिनेमा २ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमामध्ये शाहरुख खानसोबत साऊथची सुपरस्टार नयनतारा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (Bollywood News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: अनैतिक संबंधात अडसर, बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं; नागपुरमध्ये खळबळ

Beed : ...नाहीतर तुझी बायकोला घरी पाठव, बीडमध्ये व्यापार्‍याने केली आत्महत्या, भाजप नेत्याला अटक

Blue Number Plate: कोणत्या गाड्यांना निळ्या नंबर प्लेट दिल्या जातात आणि का? वाचा त्यामागील खास कारणे

Navi Mumbai : नवी मुंबईतील बस आगारात भीषण आग; नेमकं काय घडलं? | VIDEO

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

SCROLL FOR NEXT