Famous Writer Director  google
मनोरंजन बातम्या

Famous Writer Actor: कलाविश्वातून वाईट बातमी! ७३ व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्याचा जगाला निरोप; सिनेसृष्टीवर शोककळा

Famous Writer Director : तमिळ चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक के भाग्यराज यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Sakshi Sunil Jadhav

तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरवणारी एक दु:खद बातमी समोर आली आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी नामवंत दिग्दर्शक के. भाग्यराज यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण तमिळ सिनेसृष्टीने एक लोकप्रिय कलावंत गमावला आहे. अनेक दशकांपासून आपल्या अभिनय आणि दिग्दर्शनाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणाऱ्या भाग्यराज यांच्या जाण्याने चाहते सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

सुत्रांना मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी त्यांना अचानक हॉर्ट अटॅक आला आहे. त्यांची तब्बेत बिघडल्यानंतर त्यांना तातडीने चैन्नईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले, पण उपचारादरम्यान त्यांनी श्वास सोडला. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच चित्रपटसृष्टीसह राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जातोय.

के. भाग्यराज हे तमिळ चित्रपटसृष्टीतले अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व मानले जात होते. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन, पटकथा लेखन आणि निर्मिती क्षेत्रातही मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांच्या चित्रपटांमधला साध्या पण प्रभावी कथा, विनोदी शैली आणि वास्तववादी पात्रांमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं होतं. त्यांच्या उत्कृष्ट पटकथा लेखनामुळे त्यांना स्क्रीनप्ले किंग या नावाने लोक ओळखत होते.

के. भाग्यराज यांनी त्यांच्या कारकि‍र्दीची सुरुवात प्रसिद्ध दिग्दर्शक भारतीराजा यांचे सहाय्यक म्हणून केली होती. त्यानंतर त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत अनेक यशस्वी चित्रपट दिले. १९७० च्या दशकात सुरू झालेल्या त्यांच्या कारकि‍र्दीत त्यांनी २५ पेक्षा जास्त चित्रपटांचे दिग्दर्शन केले, तर 75 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: मध्यरात्री भयंकर घडलं! ड्युटीवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला जागीच संपवलं, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: परळीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस; ५० जणांना चावा

Vastu Tips For Money: कपाटात पैसे ठेवण्याविषयीच्या 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Health Tips: डायबिटीजसाठी कारलेच नाही, 'या' ५ भाज्याही गुणकारी, साखर राहील कंट्रोलमध्ये

Eye Care Tips: चष्म्याचा नंबर वारंवार वाढतोय? रोज करा 'हे' ७ सोपे उपाय; नजर राहील तीक्ष्ण

SCROLL FOR NEXT