Marathi Movie Kairee Saam TV
मनोरंजन बातम्या

Marathi Movie Kairee Poster Released: सायली संजीवच्या 'कैरी' चित्रपटाचे रॅपअप; चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

Sayali Sanjeev-Subodh Bhave Movie: शंतनु रोडे आणि सायली संजीव ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Pooja Dange

Kairee Movie Shoot Wraps Up In Landon: नुकतेच ‘कैरी’ या मराठी चित्रपटाचं लंडनमध्ये शूटिंग संपलं आहे. हा चित्रपट नेमका कशावर आधारित आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. नुकताच सोशल मीडियावर शेअर या चित्रपटातील कलाकारांचे फोटो शेअर करण्यात आले.

या फोटोंमध्ये सुबोध भावे, सायली संजीव, सिद्धार्थ जाधव आणि शशांक केतकर हे कलाकार मुख्य भूमिकेत असल्याचे दिसतंय. याव्यतिरिक्त चित्रपटात अरुण नलावडे, सुलभा आर्या आणि काही ब्रिटिश कलाकारही आहेत.

‘कैरी’ चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक शंतनु रोडे यांनी केले असून यापूर्वी त्यांनी ‘गोष्ट एका पैठणीची’चे दिग्दर्शन केले होते. ‘कैरी’च्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक - अभिनेत्री म्हणजेच शंतनु रोडे आणि सायली संजीव ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Latest Entertainment News)

नुकतेच ‘कैरी’चे ‘पोस्टर’ही प्रदर्शित झाले असून त्यात एक पाठमोरी मुलगी हातात सामान घेऊन परदेशात फिरताना दिसतेय. या चित्रपटाचा विषय काय असेल, हे जाणून घेण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.

या चित्रपटाची निर्मिती नवीन चंद्रा, नंदिता राव कर्नाड यांनी ९१ फिल्म स्टुडिओज बॅनर अंतर्गत केली असून निनाद बत्तीन, तबरेझ पटेल, एव्हीके एंटरटेनमेंट सहनिर्माते आहेत. ‘कैरी’चे लेखन स्वरा मोकाशी आणि शंतनु रोडे यांनी केले आहे.

९१ फिल्म स्टुडिओजचे सीईओ नवीन चंद्रा यांनी आतापर्यंत दहा प्रादेशिक चित्रपटांची निर्मिती केली असून यात मराठी, मल्याळम, बंगाली आणि पंजाबी भाषांचा समावेश आहे.

९१ फिल्म स्टुडिओजचे सीईओ नवीन चंद्रा म्हणतात, “हा आमचा तिसरा मराठी चित्रपट आहे. अतिशय प्रतिभाशाली कलाकारांसोबत आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत काम करतानाचा अनुभव आनंददायी होता.

लंडनमधील हवामानाचा अंदाज नसतानाही आम्ही वेळापत्रकानुसार चित्रीकरण पूर्ण करण्यात यशस्वी झालो. या वर्षाच्या अखेरीस 'कैरी' चित्रपट प्रदर्शित करण्याचा आमचा मानस आहे.” ‘कैरी’चा काही भाग कोकणातही चित्रीत झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मतदानाआधी ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद

Malegaon: मालेगावमध्ये MIM च्या उमेदवारावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला

Green Tea: वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

Air Force Recruitment: इंडियन एअर फोर्समध्ये नोकरीची संधी; अग्नीवीर वायू पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Crime News : सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा डोळा, हत्या करून मृतदेह पाईपलाईनमध्ये टाकला

SCROLL FOR NEXT