Sawai Gandharva Bhimsen Festival Cancelled Saam TV
मनोरंजन बातम्या

Sawai Gandharva Bhimsen Festival | २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान होणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द

Sawai Gandharva Bhimsen Festival: पंडित भीमसेन जोशी यांनी आपले संगीतातले गुरू रामभाऊ कुंदगोळकर यांच्या स्मरणार्थ ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची सुरुवात केली होती.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे: राज्यात व शहरात वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या आणि राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांच्याकडून परिस्थितीनुसार वेळोवेळी बदलण्यात येत असलेली नियमावली यामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर येत्या २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येत असलेला ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव (Sawai Gandharva Bhimsen Festival) रद्द (Cancelled) करण्यात येत असल्याचे आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळवले आहे.

हे देखील पहा -

यंदा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने महोत्सव व्हावा अशी रसिकांची प्रबळ इच्छा होती. परंतु महोत्सवाची भव्यता, व्याप्ती व आयोजनासाठी लागणारा वेळ बघता सद्य परिस्थितीत महोत्सव रद्द करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याचे जोशी यांनी सांगितले.

पंडित भीमसेन जोशी यांनी आपले संगीतातले गुरू रामभाऊ कुंदगोळकर यांच्या स्मरणार्थ ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची सुरुवात केली आणि गुरुभक्तीचे उदाहरण घालून दिले. भीमसेन जोशींच्या निधनानंतर ह्या संगीत महोत्सवाचे नाव ’सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ असे बदलण्यात आले. महोत्सवात हजारोंच्या संख्येने रसिक सहभागी होतात, हे याचे मोठे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील विविध गावातून, तसेच परदेशातूनही ह्या महोत्सवासाठी रसिक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pawan Singh Wife: 'मी एक तुच्छ महिला...'; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने मागितली आर्थिक मदत, सोशल मीडियावर शेअर केला क्यूआर कोड

लाडकी बहिण योजनेसाठी ekyc कशी कराल ? कोणते कागदपत्रे लागतात?

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांची भावना उद्धव ठाकरे यांना समजली, म्हणून त्यांनी तत्काळ कर्जमाफी केली - ओमराजे निंबाळकर

Customer Alert : सावधान! D-Mart मध्ये महिलांना हेरायचा अन् सोनं-पैशावर डल्ला मारायचा, पोलिसांनी सीरियल स्नॅचर’च्या मुसक्या आवळल्या

Manoj Jaranage Patil: मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी, धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT