Savitribai Jyotirao Phule Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

Savitribai Jyotirao Phule Serial: टीव्हीनंतर आता यूट्यूबवर; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेच्या डिजिटल प्रवासाला सुरुवात

Savitribai Jyotirao Phule Serial: ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका 20 जूनपासून ‘मराठी वारसा’ यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणार आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी मालिकेच्या डिजिटल प्रवासाबाबत महत्त्वाची माहिती दिली.

Shruti Vilas Kadam

Savitribai Jyotirao Phule Serial: अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान मिळविणारी ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका आता नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्राच्या घराघरांत स्थान मिळवलेली ही मालिका २० जूनपासून ‘मराठी वारसा’ या लोकप्रिय यूट्यूब वाहिनीवर पहायला मिळणार आहे.

‘मराठी दूरचित्रवाणीच्या इतिहासात प्रथमच एखादी मालिका अशा स्वरूपात पुनरागमन करत आहे. फुले दांपत्यांनी समाजपरिवर्तनासाठी दिलेला लढा, शिक्षणाची क्रांती आणि समतेचा संदेश नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावा, हाच या पुनर्प्रवासामागील आमचा उद्देश आहे. ही मालिका केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून सामाजिक जाणीव जागवणारी आणि प्रेरणा देणारी चळवळ आहे’, असे या मालिकेच्या डिजीटल प्रवासाबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत असे डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले.

याबाबत बोलताना डॉ.अमोल कोल्हे म्हणाले, ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा हा डिजीटल प्रवास अनेक निर्मात्यांसाठी पथदर्शी ठरू शकतो. या प्रवासाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून अनेक मान्यवरांनी आणि हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या उपक्रमाबद्दल सकारात्मक भावना आणि उत्सुकता निश्चितच आहे. डिजीटल प्लॅटफॉर्मवर अभिव्यक्तीची आणि मांडणीची अधिक व्यापक संधी उपलब्ध असते. त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत कथा ज्या स्वरूपात पोहोचवायची आहे, ती अधिक प्रभावीपणे मांडता येते. तसेच, या विषयाला व्यापक स्वरूप देण्यासाठी आपण भविष्यात संसदेतही हा मुद्दा मांडणार असल्याचे संकेत डॉ.अमोल कोल्हे यांनी दिले.

‘सध्या ही मालिका सर्वप्रथम ‘मराठी वारसा’ या लोकप्रिय यूट्यूब वाहिनीवर पहायला मिळणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर डिजीटल माध्यमांवर विस्तार करण्याचा आमचा विचार आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात येत असून योग्य वेळेनुसार पुढील निर्णय घेतले जातील. येत्या काळात हिंदी, तामिळ, तेलगू, इंग्रजी, बंगाली या पाच विविध भारतीय भाषांमध्ये डब करून देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे, असेही त्यांनी सांगितले.

डिजीटल माध्यमामुळे कलाकार आणि निर्मात्यांमधील अंतर कमी होत असल्याचे सांगत डॉ.अमोल कोल्हे म्हणाले, ‘आमच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर ऑडिशन टॅब सुरू केला असून, महाराष्ट्रातील नवोदित आणि गुणवंत कलाकारांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे कलाकारांना कोणत्याही मध्यस्थांशिवाय थेट आमच्याशी जोडता येईल.’ सर्जनशीलतेला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करत मालिकेच्या डिजीटल प्रवासाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी शब्दांत सांगितले कि आता ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका केवळ आमची राहिलेली नाही, तर ती आता संपूर्ण महाराष्ट्राची मालिका झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरात आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

Mangal Dosh: मंगळमुळे लग्न जमेना! 'या'५ खात्रीशीर उपायांनी दूर होईल मंगळदोष

Parbhani: हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, ५ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Masoor Bhaat Recipe: लहान मुलांना डब्ब्यात द्या पौष्टिक आणि चविष्ट मसूर भात, वाचा सोपी रेसिपी

चंद्रपूर गुदमरलं! साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT