Aishwarya Narkar Dance Video Instagram
मनोरंजन बातम्या

Aishwarya Narkar Dance Video: ऐश्वर्या नारकर यांच्या 'अंगात वारं भरलं या...'; अभिनेत्रीच्या डान्सचं नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतुक

Aishwarya Narkar Dance: ‘सातव्या मुलीची सातवी गोष्ट’ फेम ऐश्वर्या नारकर यांनी एका मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स करत सर्वांचेच लक्ष स्वत:कडे वेधले आहे.

Chetan Bodke

Aishwarya Narkar Dance Viral Video

‘सातव्या मुलीची सातवी गोष्ट’ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. मालिकेप्रमाणेच मालिकेतील कलाकार सुद्धा सोशल मीडियावर चर्चेत असतात. ‘सातव्या मुलीची सातवी गोष्ट’ फेम ऐश्वर्या नारकर नेहमीच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये असतात. नुकतंच ऐश्वर्या नारकर यांनी एका मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स करत सर्वांचेच लक्ष स्वत:कडे वेधले आहे.

नुकतंच ऐश्वर्या नारकर यांनी 'वारं भरलं या, अंगात वारं भरलं या' गाण्यावर एक रिल शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या नारकर यांच्या सौंदर्याची नेटकऱ्यांकडून जोरदार चर्चा होत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना, ऐश्वर्या यांनी 'Vibe only! Marathi vibe' असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे. नेहमीच सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर आणि त्यांचे पती अविनाश नारकर वेगवेगळ्या रिल्स शेअर करत असतात.

त्यांच्या ह्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. "मॅडम आज ५३ व्या वर्षी आपला अभिनय आणि सौंदर्य एखाद्या ३० वर्षांच्या बाईला देखील लाजवेल असे आहे.. सलाम आहे. आमची आत्ताची पिढी वयाच्या ५३ ते ६० पर्यंत कशी असेल..?" अशी कमेंट एका युजरने केली आहे. (Social Media)

तर आणखी एक युजरने ऐश्वर्याच्या डान्सचे "खूप उत्तम" म्हणत कौतुक केले आहे. तर पती अविनाश नारकर आणि ऐश्वर्याची मैत्रिण तितिक्षा तावडेने मस्त मस्त म्हणत डान्सचे कौतुक केले. ऐश्वर्या नारकर यांच्या कामाविषयी सांगायचे तर, ऐश्वर्या नारकर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गरमा गरम चहासोबत खा पोहा कचोरी, घरी बनवण्याची सोपी रेसिपी

Kidney stone symptoms: सतत पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका; किडनी स्टोन झाल्यावर शरीर देत असलेली ही 8 लक्षणं ओळखा

Maharashtra News Live Update: कुडाळ तालुक्यातील जांभवडे- खोचरेवाडी पूल खचला

Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात हत्याकांडाचा थरार, डोक्यात दगड घालून तरुणाला जागीच संपवलं

Pub Fire: मध्यरात्री पबमध्ये अग्नितांडव, भीषण आगीमध्ये होरपळून २७ जणांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT