Sankarshan Karhade Share a Good News Instagram @sankarshankarhade
मनोरंजन बातम्या

Sankarshan Karhade Post: संकर्षण कऱ्हाडेने पोस्ट करत शेअर केली 'ही' गुड न्यूज

Sankarshan Karhade Play niyam v ati lagoo: संकर्षणच्या सध्या सुरू असलेल्या “नियम व अटी लागू…” नाटकाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Pooja Dange

Sankarshan Karhade Play niyam v ati lagoo Won Award: 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या शोच्या माध्यमातून अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची महाराष्ट्राला ओळख झाली. या शोनंतर संकर्षणला महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर करायला वेळ लागला नाही. अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून संकर्षण आपल्या भेटीला येतो. सध्या त्याचे एक नाटक “नियम व अटी लागू…”ची चर्चा आहे.

संकर्षण सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्याने नुकतीच एक गुड न्यूज त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. संकर्षणच्या सध्या सुरू असलेल्या “नियम व अटी लागू…” नाटकाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

संकर्षणने केलेल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहेत, 'आनंदाची बातमी…. “नियम व अटी लागू…” ह्या मी लिहिलेल्या व प्रमुख भूमिकेत काम करत असलेल्या नाटकाला यंदाचा. मा. “दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात ; मोहन वाघ पुरस्कार मिळाला ..” दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानद्वारे दिला जाणारा हा पुरस्कार सोहळा २४ एप्रिल, २०२३ संपन्न होणार आहे. दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानद्वाराव दिल्या जाणारा मोहन वाघ पुरस्कार 'नियम व अति लागू' या नाटकाला मिळणार आहे.

या पुरस्कारांतर्गत या नाटकाला एक लाख एक हजार एक रुपये रोख आणि मानचिन्ह देण्यात येणार आहे.

नियम व अटी लागू या नाटकाचे लेखन स्वतः संकर्षण कऱ्हाडेने केले आहे. तर प्रशांत दामले यांच्या पत्नी सौ. गौरी दामले या नाटकाच्या निर्मात्या आहेत. संकर्षणसह अमृता देशामुख आणि प्रसाद बर्वे मुख्य भूमिका साकारत आहेत.

यासह संकर्षणचे 'तू म्हणशील तसं' हे नाटक देखील सुरू आहे. तसेच संकर्षणने झी मराठीवरील 'तुझी माझी रेशीम गाठ' या मालिकेत समीर हे पात्र साकारले होते. श्रेयस तळपदेच्या मित्राची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.

संकर्षणला लोकसत्ताचा “तरुण तेजांकित” पुरस्कार देऊन देखील गौरविण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT